Eknath Khadse says The position of the BJP worse due to Fadnavis 
पश्चिम महाराष्ट्र

फडणवीस यांच्यामुळेच भाजपची अवस्था बिकट : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

सोनई (नेवासे, नगर): ""भारतीय जनता पक्षाला सर्वत्र अच्छे दिन असताना, महाराष्ट्रात मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या म्होरक्‍यांमुळे पक्षाची अवस्था बिघडत आहे. कुणी कितीही रोखायचा प्रयत्न केला तरी नाराजीचे चक्रीवादळ आजही घोंगावत आहे,'' असे रोखठोक मत माजी महसूलमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज व्यक्त केले.

खडसे यांनी आज परिवारासह शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदर्शन घेतले. त्या वेळी उदासी महाराज मठात त्यांनी "इडा पिडा टळो'चा अभिषेक केला. जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर उपस्थित होते.

फडणवीस टीमवर नाराज

या वेळी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, ""मी भाजपवर नाराज नाही, तर पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मी माझ्या मनातील रोष व्यक्त करणारच आहे.'' 

"वेळ आल्यावर धमाका होणारच!'

पक्षाविरुद्ध बंड करणार का? या प्रश्‍नावर "वेळ आल्यावर धमाका होणारच आहे,' असे खडसे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याने ही खिचडी फार दिवस टिकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT