Election of kolhapur District President of Bharatiya Janata Party kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार...?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष (शहर) पदाची निवड सोमवारी (ता. १३) होणार आहे. यासाठी राहुल चिकोडे यांचे नाव जवळपास निश्‍चित आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षाची निवड मंगळवारी (ता. १४) होणार असून, यासाठी समरजितसिंह घाटगे आणि महेश जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाल्याचा पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. पक्षाच्या घटनेनुसार पहिल्या तालुकाध्यक्ष व शहरातील मंडलाध्यक्ष यांच्या निवडी केल्या जातात. त्यानंतर निवडलेले पदाधिकारी जिल्हाध्यक्षाची निवड करतात. निवडणुका झाल्या असून आता जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात अन्य पक्षातील नेते आले. त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. परिणामी आता पक्षात नवे आणि जुने असा छुपा संघर्ष काही प्रमाणात दिसतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. शहरात महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांना दिले गेले. गटनेते पदाची माळ आशिष ढवळे यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत. दोन्ही ठिकाणी महाडिक समर्थक असल्याने जिल्हाध्यक्ष (शहर) पदी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्याला संधी देणे अपरिहार्य आहे. याशिवाय राहुल चिकोडे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विश्‍वासातील आहेत. त्यामुळे पदासाठी त्यांचे नाव निश्‍चत समजले जात आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सध्या हिंदुराव शेळके आहेत. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नव्या चर्चेत त्यांचे नाव नाही. 

समरजित आघाडीवर

माजी आमदार सुरेश हाळवणकर प्रदेश कार्यकारिणीमध्ये असल्याने तेही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार नाहीत. समरजित यांच्या नावावर जुने आणि नवे दोघांचेही एकमत आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. महेश जाधव यांच्याही नावाची चर्चा आहे, मात्र समरजित यांचे नाव आघाडीवर आहे. सोमवारी आणि मंगळवारी ही नावे निश्‍चित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT