vidhansabha results 2019  
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी गड राखणार का? | Election results 2019

अशोक मुरुमकर

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शहर उत्तर, शहर मध्य व अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर नारायण पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. ते सुमारे 11 हजार मताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व शिवसेनेच्या रश्‍मी बागल यांच्या पुढे आहेत. बार्शीत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेनेचे दिलीप सोपल व सांगोल्यातून शहाजीबापू पाटील हे आघाडीवर आहेत. शहर मध्यमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश कोठे हे पिछाडीवर पडले असून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे या आघाडीवर आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मंगळवेढा येथून भारत भालके, माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर, मोहोळमध्ये यशवंत माने, उत्तरमधून मनोहर सपाटे, बार्शीतून निरंजन भूमकर व माढ्यात बबनराव शिंदे हे उमेदवार रिंगणात आहेत. तर कॉंग्रेसकडून अक्कलकोटमध्ये सिद्धराम म्हेत्रे व शहर मध्यमधून प्रणिती शिंदे, दक्षिणमधून बाबा मिस्त्री हे रिंगणात आहेत. भाजपकडून माळशिरसमध्ये राम सातपुते, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, दक्षिणमधून सुभाष देशमुख, पंढरपूरमधून सुधाकर परिचारक व उत्तरमधून सुभाष देशमुख रिंगणात आहेत. शिवसेनेकडून करमाळ्यातून रश्‍मी बागल, सांगोल्यातून शहाजीबापू पाटील, मोहोळमध्ये नागनाथ क्षीरसागर, बार्शी दिलीप सोपल, मध्य मध्ये दिलीप माने या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. शहर मध्य मध्ये एमआयएमचे फारुक शाब्दी यांनी पहिल्या फेऱ्यांमध्ये जोरदार आघाडी घेतली मात्र. पुन्हा ते मागे पडले.

जिल्ह्यातील काही मतदार संघामध्ये चुरशीचा सामना असून प्रत्येक फेरीत आकडेवारी बदलत आहे. त्यामुळे कोण विजय होणार हे अद्याप सांगता येत नसले तरी राष्ट्रवादी जिल्ह्यात गड राखेल असे चित्र आहे. 12 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत मागे पडलेल्या कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे या आघाडीवर आले आहेत. तर माळशीरसमध्ये आघाडीवर असलेले जानकर यांच्या मताधिक्‍य कमी होऊन 11 हजार 835 झाले. करमाळ्यातील नारायण पाटील हे 11 हजार मताने पुढे गेले आहेत. दिलीप सोपल हेही काही फेऱ्यात मागे पडले होते. मात्र राऊत यांना मागे टाकत ते पुढे आले आहेत. सहकारमत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. माढ्यातून बबनराव शिंदे हे आघाडीवर आहेत. प्रत्येक फेऱ्यांमध्ये चित्र बदलत असल्याने अद्याप विजय कोणाचा हे निश्‍चित नसले तरी जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जलसंधारणमंत्री तानाजीराव सावंत यांनी दिलेले उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. सोलापूरातील मध्य मतदार सघात दिलीप माने हे कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. ते सध्या पिछाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

SCROLL FOR NEXT