election of teachers organisation of belgaum for tomorrow in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत मोठी चुरस ; उद्या होणार मतदान

मिलिंद देसाई

बेळगाव : सर्व शिक्षकांचे लक्ष लागुन राहिलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनेची निवडणुक मंगळवार (15) रोजी होणार आहे. सकाळी 7.30 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असुन बेळगाव तालुक्‍यातील शिक्षक सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 येथे तर शहरातील शिक्षक सरकारी कन्नड शाळा क्रमांक 26 विश्वेश्‍वरय्यानगर येथे मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळुन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

नोव्हेंबर 2019 मध्ये मुदत संपलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनेची निवडणुक काही दिवसांपुर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 6 डिसेंबर निवडणुक होणार होती. मात्र बंगळुर येथे समस्या निर्माण झाल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे शिक्षकांमधुन आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत होते. तसेच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली होती. यावेळी निकाल देताना नवे वेळापत्रक जाहीर करुन निवडणुक घेण्याचा आदेश बजावण्यात आला होता. 

वेळापत्रक जाहीर झाल्यापासुनच शिक्षकांनी मोठ्‌या प्रमाणात प्रचारावर भर दिला होता. शहर आणि तालुक्‍यात गुरुस्पंदन व परीवर्तन पॅनेलमध्ये मोठ्‌या प्रमाणात चुरस असुन निवडणुक जाहीर झाल्यापासुनच दोन्ही पॅनेलतर्फे जोरदार प्रचार करण्यात आला आहे. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे दोन्ही पॅनेलकडुन आश्‍वासन देण्यात आले आहे. सकाळी 7. 30 वाजल्यापासुन मतदानाला सुरुवात होणार आहे. तर मतदानानंतर सांयकाळी 5 वाजता मत मोजणीला सुरुवात होणार असुन रात्री 8 वाजेपर्यंत निकाल हाती येणार आहेत. 

शहरात 700 शिक्षक मतदार आहेत तर तालुक्‍यात 1493 शिक्षक मतदार असुन यापैकी सर्रास मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनेलतर्फ करण्यात आला आहे. निवडणुक जाहीर करण्यात आल्यापासुन बैठका, मेळावे आणि, सभांसह भोजनावळीवर भर देण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक संघटनेची निवडणुक चुरशीची होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT