Encroachment in Islampur, decision to discipline parking
Encroachment in Islampur, decision to discipline parking 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूरात अतिक्रमण, पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील नगर व्याख्यानमालेसाठी झालेल्या खर्चावरून आज पालिकेत वादळी चर्चा झाली. एकमेकांना शब्द-अपशब्द वापरण्यावरून गदारोळ झाला. नंतरच्या चर्चेत हे शब्द मागे घ्यायचे ठरले. शहरातील अतिक्रमण व पार्किंगला शिस्त लावण्यावरून महत्त्वाचे निर्णय झाले. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत सभा झाली. व्याख्यानमाला खर्चाला मान्यता देण्यावरून दोन्ही बाजुंनी वाद झाला. "अवास्तव' खर्च, "उधळपट्टी' आणि संग्राम पाटील यांनी उच्चारलेल्या "सुपारीबहाद्दर' या शब्दावरून एकमेकांवर चिखलफेक झाली. अमित ओसवाल आणि वैभव पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी आपला शब्द मागे घेतला. संबंधितांना बिले न देता तो खर्च दाखवण्यात आला असल्याचा आरोप विक्रम पाटील यांनी केला. शहाजी पाटील यांनी या खर्चावर नगराध्यक्ष यांचे कसलेच नियंत्रण नसल्याचा आरोप केला. चर्चेअंती सर्व बिलांची पुनर्तपासणी करून अवास्तव खर्च कमी करून वार्षिक टेंडरप्रमाणे बिले देण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी जाहीर केला. 

शहरातील पार्किंग व वाहतूक व्यवस्थापन धोरण ठरविण्याबाबत चर्चा झाली. तहसील कार्यालय इमारतीच्या पार्किंगमध्ये गाड्या लावण्यासंदर्भात पत्र देण्याचे ठरले. शहरातील अतिक्रमण काढण्याचे सर्वाधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्याचे ठरले.

 इंजिनिअर्स असोसिएशनच्या सूचना विचारात घेऊन अंमलबजावणी होईल, रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय झाला. पेठ-सांगली रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, वाहने, फलक काढण्याचे ठरले. बॅंका व तत्सम संस्थांना पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जातील. साडे चार लाख रुपये औषधांवर खर्च झाले असतील यावर विश्वास बसत नाही अशी शंका प्रदीप लोहार यांनी मांडली. आनंदराव पवार, प्रतिभा शिंदे, संगीता कांबळे, सुप्रिया पाटील, दादासो पाटील यांनी स्वच्छतेच्या तक्रारी मांडल्या. नगरसेवकांच्या सहीशिवाय स्वच्छता ठेकेदारांची बिले न देण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना केली. मालमत्ता व्यवस्थापक नेमण्यावर चर्चा झाली. 

टॅंकरने पाणीपुरवठ्याचा विषय तहकूब! 
टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण ठरविण्याचा विषय तहकूब करण्यात आला. टॅंकरचे दर वाढवण्याला सदस्यांनी विरोध केला. दरम्यान मक्ता पद्धतीने पाणी न देण्याची सूचना शहाजी पाटील, विश्वनाथ डांगेनी केली. त्यावरील तरतूद करण्यासाठी पूर्ण माहिती मिळेपर्यंत हा विषय तहकूब करण्यात आला. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT