पश्चिम महाराष्ट्र

नाद नाय करायचा : कऱ्हाड पालिका अव्वल; सातारा पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पालिकेच्यावतीने राबवण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहिम आज सलग दुसऱ्यादिवशीही सुरु राहिली. या मोहिमेचे सर्वसामान्य नागरीकांतुन स्वागत होत आहे. दरम्यान कालपासुन सुरु झालेल्या या मोहिमेचा शहरातील अतिक्रमण धारकांनी या मोहिमेचा मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे कारवाईत होणाऱ्या नुकसीचा धसका घेवुन आज पहाटेपासुनच अनेकांनी स्वतःहुन अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला आहे. हे या धडक कारवाई मोहिमेचे यशच मानले जात आहे.

कऱ्हाडमधील अनेक वर्षांपासुन रखडलेली अतिक्रण हटाव मोहिम पालिकेने सध्या हाती घेतली आहे. कालपासुन सुरु असलेल्या या मोहिमेसाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर आहेत. या धाडसी मोहिमेतुन काल 350 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. आज सकाळपासुन पुन्हा ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. कोल्हापुर नाका ते दत्त चौक आणि विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यान ही मोहिम आज सुरु होती. त्यामध्ये रहदारीस अडथळा ठरणारी आणि अवैध असलेली बांधकामे हटवण्याची कार्यवाही पालिकेच्या पथकाकडुन करण्यात येत आहे. येथील पोपटभाई पंप चौक परिसरातील आणि दत्त चौकातील अतिक्रमणेही हटवताना मोठी गर्दी जमली होती. बराचकाळ तेथे ही मोहिम सुरु होती. अनाधिकृतरित्या केलेले कट्टे, पायऱ्या, पत्र्याचे शेड, होर्डींग यावरही हातोडा फिरवण्यात आला. 

वाचा : बाप हो देव पाहिला का देव ?

दोन अतिक्रमणे काढून साताऱ्यात मोहीम थंड? 

सातारा : नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पालिकेने हिरीरीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. परंतु, संपूर्ण आठवड्यामध्ये केवळ दोन ठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मोठा गवगवा केलेली ही मोहीम थंडावली काय, असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. 

पालिकेच्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वच आघाड्यांच्या नगरसेवकांनी अतिक्रमणांच्या मुद्द्यावर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणे फोफावत चालली असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्याचबरोबर सर्वांनी एकत्रितपणे अतिक्रमणांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच जो कोणी या मोहिमेत अडथळा आणण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल, त्याची नावे सभागृहात मांडण्यास प्रशासनाला सांगण्यात आले होते. नगरेसवकांच्या भूमिकेमुळे त्यानुसार सोमवारपासून (ता. 17) अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सभागृहात सांगितले होते. 
मुख्याधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी अतिक्रमणांविरोधी मोहीम सुरूही झाली. त्यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात एजंटांनी पदपथावर अतिक्रमणे केली होती, तसेच चहाच्या टपऱ्याही मोठ्या प्रमाणावर थाटल्या गेल्या होत्या. या अतिक्रमणांवर पालिकेच्या पथकाने हातोडा मारला. दहा दिवस अखंडपणे ही मोहीम सुरू राहणार असल्याचे तेव्हा पालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात दोनच दिवस ही मोहीम चालली. मंगळवारी (ता. 18) माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील काही टपऱ्या हटविण्यात आल्या. त्यानंतर मात्र, अतिक्रमणविरोधी पथकाकडून काहीच हालचाल दिसली नाही. शहरातील अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आजही उभी आहेत. त्यांच्याकडे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी एवढ्या आक्रमकपणे भूमिका मांडूनही मोहीम का थंडावलीय, हा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. वास्तविक लोकप्रतिनिधींकडून पाठबळ मिळाल्यावर प्रशासनाने अधिक जोरदारपणे कारवाईचा बडगा उगारणे आवश्‍यक होते. परंतु, दोन ठिकाणे वगळता अन्य अतिक्रमणांवर कारवाई झालेली नाही. मोहीम सुरू झालेल्याला उद्या दहा दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे दहा दिवसांच्या मोहिमेत केवळ दोनच ठिकाणी कारवाई, अशी या मोहिमेची तऱ्हा झाली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून ठोस कारवाई करणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा : ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

पेटवून घेण्याचा प्रयत्न 

दरम्यान, पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सांगितले गेल्याने हॉकर्स संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम व शहराध्यक्ष संजय पवार यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालिका, बांधकाम विभाग, पोलिस व संघटनेमध्ये झालेल्या बैठकीत दहा दिवसांमध्ये हॉकर्ससाठी स्वतंत्र जागा पाहण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणांवरील कारवाई तूर्तास थांबल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT