Enlightenment on Corona in Ahmednagar
Enlightenment on Corona in Ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : नगरी पोरांनी कोरोनाला लावलं पळवून, कसं ते पहा.. 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर शहरातील दुबईहून आलेली व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आलं आहे. रूग्ण सापडल्याची अफवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून होती. मात्र, ती काल खरी ठरली. सोशल मीडियातून ही माहिती गावोगाव पसरली. त्यामुळे नगरकरांमध्ये भीतीने वातावरण आहे. बहुतेकांनी मेडिकल दुकानांमध्ये मास्क खरेदीसाठी धाव घेतली आहे. 

वाढलेले ग्राहक पाहून काहींनी चढ्या भावात विक्री सुरू केली आहे. तरीही नागरिक मिळेल त्या भावात खरेदी करीत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोनाबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन केले असले तरी लोकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या घटनांमध्ये नागरिकांच्या भीतीमध्ये वाढ होत आहे. 
पाथर्डी व नेवासा तालुक्‍यात आणखी दोन रूग्ण असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याला दुजोरा दिला जात नाही. काल कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. अद्यापि तिला सर्दी, खोकला असा कोणतीही लागण झालेली नाही. 

तो फाशी घेऊन मेला... 
कोरोनाची भीती कमी व्हावी म्हणून काल नगर शहरातील माळीवाड्यातील तरूणांनी वेगळाच उपक्रम हाती घेतला. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाला पळून लावलं. रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी डीजे लावून ही जनजागृती करीत कोरोनाला पळवून लावलं. खासदार रामदास आठवले यांनी गो कोरोना गो अशा घोषणा दिलेली क्‍लिप सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होत आहे. तीच क्‍लिप लावून तरूणांसह लहान मुलांनी कोरोनाला घोषणा देत पळवून लावलं. ती क्‍लिपही सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनाची भीती घालवण्यासाठी हा नामी उपाय असल्याचे त्या मुलांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT