Even after eleven years, the work of Biroba Bhakt Niwas is incomplete 
पश्चिम महाराष्ट्र

अकरा वर्षांनतरही बिरोबा भक्त निवासस्थानाचे काम अपूर्ण 

सदाशिव पुकळे

झरे : कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथील बिरोबा देवस्थान येथे 2008-9 मध्ये तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्त निवास बांधण्यात आले होते. परंतु 11 वर्ष झाले तरी भक्त निवास चे काम अपूर्णच आहे. 

सन 2008-2009 मध्ये तीर्थक्षेत्र विकासनिधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले होते. त्या निधीतून भक्त निवास बांधण्यासाठी सुरुवात झाली, परंतु आतापर्यंत काम रखडले आहेण भिंती उभ्या केल्या आहेत, स्लॅब टाकला आहे. परंतु भिंतींना प्लास्टर केलेले नाही. फरशी बसवलेली नाही, दरवाजे खिडकी बसवलेले नाहीत. संपूर्ण काम अपूर्ण अवस्थेत आहे. 

10 लाख निधीपैकी ठेकेदाराला 7 लाख 27 हजार रुपये दिले आहेत. तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे होते. परंतु गेले 10 ते 11 वर्षांमध्ये काम पूर्ण झालेच नाही. त्यामुळे उर्वरित निधी पडून आहे. उर्वरित राहिलेला निधी 2 लाख 73 हजार रुपये आहे. परंतु बांधकामाच्या साहित्यात, दरामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट वाढ झालेली आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या रकमेमध्ये हे काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे वरील कामाला वाढीव निधीची गरज आहे. परंतु ठेकेदाराने काम पूर्ण का केले नाही. याचीही चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या बिरोबा देवस्थानाच्या भक्त निवासचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम अपूर्ण आहे. कामाची चौकशी करावी व ठेकेदाराने काम त्वरित पूर्ण करावे. 
- ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य 

बिरोबा मंदिराच्या भक्त निवास खोल्यांचे काम त्वरित पूर्ण करावे, व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी 
- सविता वगरे, सरपंच. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

SCROLL FOR NEXT