Every day we have a war .. 
पश्चिम महाराष्ट्र

रोज आम्हा युद्धाचा प्रसंग...सख्खे भाऊ लढताहेत कोरोनाविरूद्ध

दत्ता इंगळे

नगर तालुका : मागील दीड महिन्यापासून त्यांनी घराचे दारही पाहिले नाही. घरी फक्त फोनवर बोलणं होतं, बाकी सर्व काही रुग्णालयातच. कोरोना संशयित असो, वा कोरोनाबाधित; प्रथम कर्तव्य समजून चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील दोन रुग्णवाहिकाचालक असणारे सख्खे भाऊ सेवा करीत आहेत. 

जीवन व दीपक बाळासाहेब कांबळे, अशी या बंधूंची नावे. चिचोंडी पाटील या खेडेगावातील ग्रामीण रुग्णालयात हे बंधू सेवेत आहेत. 102 व 108 या रुग्णवाहिकांवर काम करतात. 102 ही रुग्णवाहिका गरोदर महिलांची ने-आण व इतर सोयींसाठी वापरली जाते, तर 108 ही अत्यावश्‍यक सेवेसाठी वापरली जाते. एकाच कुटुंबातील ही भावंडे ठेकेदारी पद्धतीने काम करतात. सध्या दोघेही नगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. 

कोरोना संशयित रुग्णांना आणणे, निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना घरी पोचविणे, अशी सर्व नेमून दिलेली कामे अगदी हसत, प्रामाणिकपणे करतात. दोन्ही बंधू आपत्ती प्रशिक्षण घेऊन सेवेत रूजू झाले आहेत. 

कोरोनाच्या महामारीने जग गोंधळून गेले आहे. कोरोना संशयित अथवा कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर, चांगली सेवा मिळावी. तो रुग्ण बरा होऊन आपल्या कुटुंबात जावा, यासाठी आम्ही दोघे बंधू प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गेल्या दीड महिन्यापासून घराचे तोंडही पाहिलेले नाही. घरच्यांशी फक्त फोनवर बोलतो. प्रशासनाचे पाठबळ, वरिष्ठांचे प्रोत्साहन आणि नागरिकांची साथ, यातच जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते. 
- जीवन कांबळे, रुग्णवाहिकाचालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT