पश्चिम महाराष्ट्र

घरभेदी....कारभाऱ्यांच्याच हस्तक्षेपामुळे कर वसुलीवर परिणाम

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : मिळकतकराची सुमारे सव्वातीन लाख रुपयांची थकबाकी असलेल्या माजी नगरसेवकासह तब्बल 104 जणांचे नळजोड महापालिकेच्या कर संकलन विभागाने आजअखेर तोडले. दरम्यान, थकबाकी वसुलीदरम्यान राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळकतकराच्या थकबाकीवर लागलेल्या दंडात तब्बल 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला व त्यानुसार वसुलीही सुरू केली. त्यामुळे थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल असे अपेक्षित होते. मात्र आजी-माजी नगरसेवकांचा हस्तक्षेप वाढला आहे. 

50 हजार 594 जणांचा दंड होणार 75 टक्के माफ 
स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या यादीत समावेश झालेल्या सोलापूर शहरातील तब्बल 50 हजार थकबाकीदारांना त्यांना झालेल्या दंडात 75 टक्‍क्‍यांची सवलत मिळणार आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त तावरे यांनी गेल्या जारी केले. मिळकतकराची थकबाकी असेल तर दरमहा दोन टक्के दंड लावण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे. सोलापूर शहरातील गावठाण भागात 93 हजार 822 मिळकतदार आहेत. त्यापैकी 43 हजार 228 मिळकतदारांनी नियमित बिल भरले आहे. तर 50 हजार 594 मिळकतदारांना दोन टक्के दंड झाला आहे. ही थकबाकी 58 कोटी 94 लाख 72 हजार 183 इतकी आहे. या रकमेपैकी 75 टक्के दंडाची रक्कम ही माफ केली जाणार आहे. मात्र त्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत संबंधित मिळकतदाराने त्याच्याकडील सर्व थकबाकी एकवट भरणे आवश्‍यक आहे. 

नोटीस व वॉरंट फीही पूर्णपणे माफ
दंडाच्या रकमेत 75 टक्के माफ करण्याबरोबरच नोटीस व वॉरंट फीही पूर्णपणे माफ केली जाणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडे 3.81 कोटींची वॉरंट फी आणि 1.72 कोटींची नोटीस फी थकीत आहे. ही सर्व माफ होणार आहे. हद्दवाढ भागातील मिळकतदारांना आतापर्यंत 42 कोटींचा दंड झाला आहे. त्यापैकी 75 टक्के रक्कम आता माफ होणार आहे. शहर व हद्दवाढ मिळून एकूण दंडाची रक्कम सुमारे 100 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी जवळपास 75 कोटींचा दंड माफ होण्याची शक्‍यता आहे. शहर विभागात मार्चअखेरपर्यंत 228 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. 32 पेठांतील मिळकतदारांकडे 168 कोटी रुपयांची थकबाकी आणि चालू वर्षातील 60 कोटी रुपयांचा कर आहे. येत्या मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT