Ex Karnataka Minister Malhargouda Patil No More  
पश्चिम महाराष्ट्र

माजी मंत्री मल्हारगौडा पाटील यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर ( बेळगाव ) - माजी मंत्री, सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले व एस. बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याची धुरा यशस्वीपणे पार पाडलेले येथील सुपूत्र माजी मंत्री मल्हारगौडा पाटील (वय 79) यांचे मंगळवारी (ता. 31) रात्री उशिरा हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. बुधवारी (ता. 1) दुपारी 1 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

हजारो मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. त्यांच्या निधनामुळे संकेश्वर शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे. बुधवारी येथील दुरदुंडेश्वर विद्या संवर्धक संघ, हिरण्यकेशी शिक्षण मंडळ, पंचाचार्य शिक्षणसंस्था, गौतम शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था यांच्यासह विविध संघ संस्थांनी सुट्टी जाहीर केली होती. शहरातील व्यापाऱ्यांनीही आपले व्यवहार बंद ठेवून अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला. दुपारी 1 वाजता त्यांच्या नवीगल्ली येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. नवीगल्ली, महालक्ष्मी मंदिर, गांधीचौक, रंगाची चावडी, सुभाषरोड, कार्पोरेशन बँकमार्ग, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यानजीक असलेल्या त्यांच्या शेतीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुणालगौडा यांनी विधी केले. 

यावेळी माजी मंत्री, आमदार उमेश कत्ती, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार रमेश जिगजिनगी, पवन कत्ती, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी पालकमंत्री शशिकांत नाईक, उद्योगपती एस. एस. पाटील, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब शिरकोळी, अमर नलवडे, संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शंकरराव भांदुर्गे, गजानन कोळ्ळी, राजेंद्र संसुद्दी, संजय नष्टी, अभिजीत कुरणकर, सोमशेखर कणगली, पवन पाटील, बसवराज बागलकोटी यांच्यासह नगरसेवक, जिल्हा, तालुका पंचायत सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री मल्हारगौडा पाटील आद्य निजलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, निडसोसी एसजेपीएन ट्रष्टचे उपाध्यक्ष यासह विविध सहकारी संघ संस्थांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मागे पत्नी, सून, मुलगी, नातू असा परिवार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हिवरखेड प्रा.आ.केंद्रात अवैध गर्भपाताची शक्यता

SCROLL FOR NEXT