excise department restrictions on alcohol sales for election candidate in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

अबकारी खाते शेर आणि उमेदवार मात्र सव्वाशेर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : एका व्यक्‍तीला एकावेळी दहापेक्षा जास्त दारूच्या बॉटल्स विक्री करण्यावर अबकारी खात्याने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत दहापेक्षा जास्त बॉटल्स दारु विक्री करण्यात येऊ नये, अन्यथा संबंधित दुकानावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दारु मिळविण्यासाठी उमेदवारांनीही शक्‍कल लढविली असून आपल्या समर्थकांना विविध मद्य दुकानांना पाठवून दारुसाठा केला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता जारी झाल्याने याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मतदारांना आमिष दाखविण्यासाठी दारु पुरविली जाण्याची शक्‍यता व्यक्‍त करत अबकारीने मद्यविक्री दुकानांवर कडक निर्बंध लादले आहेत.

जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानदारांना एका व्यक्‍तीला एकावेळी दहापेक्षा जास्त दारुची बॉटल्सची विक्री न करण्याची सूचना केली आहे. या निर्बंधामुळे उमेदवारांकडून गोवा बनावटीच्या दारुची तस्करी होण्याचा शक्‍यता आहे. याला आळा घालण्यासाठी कणकुंबी तपास नाक्‍यावरही वाहन तपासणी कडक करण्यात आली आहे.

गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसात कणकुंबी तपासणी नाक्‍यावर मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. अबकारी खात्याने मद्यविक्री दुकानांवरही निर्बंध लादले असले तरी अनेकठिकाणी बेकायदा मद्यविक्री सुरुच आहे. त्यावर कधी अंकुश येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उमेदवारांनीही चांगली शक्‍कल लढविली असून दारुसाठा करण्यासाठी समर्थकांना विविध ठिकाणच्या दारु दुकानांना पाठविण्यात येत आहे. तर काहींनी निवडणूक जाहीर होताच दारुसाठा केल्याची चर्चा आहे.

"निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरणे पालन करावे. विशेषकरून जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानदारांनी कायद्याच्या चौकटीत दारूची विक्री करावी. एका व्यक्‍तीला केवळ दहाच बॉटल्स दारूची विक्री करण्याचे बंधन आहे."

- सी. एस. पाटील, अबकारी उपअधीक्षक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT