Exclude slum dwellers, cancel user tax
Exclude slum dwellers, cancel user tax 
पश्चिम महाराष्ट्र

झोपडपट्‌टीधारकांना वगळा, उपयोगकर्ता कर रद्द करा

बलराज पवार

सांगली : घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कोणतीही सुविधा न देता महापालिकेने उपयोगकर्ता कर लागू केला आहे. तो तातडीने रद्द करावा अशी मागणी मदनभाऊ युवा मंचच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. 

पालकमंत्री पाटील यांना युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कचरा संकलन करणे, त्याचे वर्गीकरण करणे, सार्वजनिक आरोग्यस धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारणे, कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे, महापालिकेच्या संकेतस्थळावर कचरा संकलनाचे वेळापत्रक करणे आदी विविध सुविधा करण्याचे नियम आहेत. 

या सर्व सोई दिल्यानंतरच कचरा व्यवस्थापन सेवा दिल्यापोटी अनुसूचि एकमध्ये नमूद दराने उपयोगकर्ता शुल्क वसुल करू शकतात, मात्र महापालिका यातील कोणतीही सेवा पूर्ण क्षमतेने करत नसताना उपयोगकर्ता कर वसूल करत आहेत ही अन्यायकारक बाब आहे. झोपडपट्‌टीमध्ये 57 रूपये ते 125 रूपये वार्षिक घरपटटी असताना वार्षिक 600 रुपये उपयोगकर्ता कर लावण्यात आला आहे. त्यात दरवर्षी पाच टक्के वाढ प्रशासनाने सुचवलेली आहे. यातून 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना स्वच्छता करातून वगळण्यात यावे. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, मयूर बांगर, अवधूत गवळी, नितीन भगत, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT