पश्चिम महाराष्ट्र

कॉंग्रेसच्या वर्धापन दिनीच 'यांची' हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्ष व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काम केल्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, भीमराव पाटील, किरण बर्गे अशा मंडळींची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव आज झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आला. सर्वानुमते त्यास टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली.
 
कॉंग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कॉंग्रेसच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. या वेळी अजितराव चिखलीकर यांनी पक्षविरोधात कारवाई करणाऱ्यांविरोधात जोरदार हल्ला चढविला. आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, मदनराव भोसले हे पक्षातून गेल्यामुळे पक्षाला चढतीकळा आली आहे. ते भुजंगासारखे एकाच इटेवर अडून बसले होते. ते गेले ते अतिशय चांगले झाले. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मिशन हा नारा यशस्वी करायचा आहे. ज्या चुका झाल्या त्या सुधारून कामाला लागलो आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आम्ही काबीज करणार आहोत.

हेही वाचा -  खारुताईची शाळेत धमाल मस्ती

जयकुमार गोरेंनाही ताकद दिली म्हणून ते होते. आता वजा केले तर ते शेवटच्या लाईनला बसतात. आनंदराव पाटलांचा तर चार महिने कुठे पत्ताच नाही. मदनराव भोसले हे तर कोमात गेले ते अजून बाहेर आलेच नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर चिखलीकर यांनी माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, भीमराव पाटील, किरण बर्गे अशा मंडळींची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव मांडला. त्याला सर्वानुमते टाळयांच्या गजरात मंजुरी देण्यात आली.
 
दरम्यान, बैठकीपूर्वी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर भावे यांच्या हस्ते आज करण्यात आली. या वेळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाल्यानंतर शहरातून संविधान बचाव, देश बचावची रॅली काढण्यात आली. या रॅलीत सातारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. विजयराव कणसे, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, रजनी पवार, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, ऍड. धनावडे, अजित चिखलीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जरुर वाचा -  गुलाबी थंडीत ते पडले प्रेमात ?

पुस्तक प्रदर्शनात हजारो विषयांवरची पुस्तके उपलब्ध केलेली आहेत. सत्तर रुपयांत पुस्तके मिळत आहेत, त्याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विराज शिंदे यांनी केले. लवकरच युवा जोडो अभियान घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT