पश्चिम महाराष्ट्र

देसाई कुटुंब संसारातून वेळ काढून करताहेत मास्कची शिलाई

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा)  ः लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे पापड, चटण्या, सांडगे बनविण्यासह अन्य घरगुती कामांमध्ये व्यस्त असताना ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील सुवर्णा अनिल देसाई आणि त्यांचे कुटुंबीय मात्र शिलाई मशिनवर मास्क तयार करण्यात व्यस्त आहेत. कोणताही मोबदला न घेता हे कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तेथील शिवसमर्थ परिवाराला मास्क पुरवत असून, त्यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत हे मास्क पोचवले जात आहेत.
 
देसाई कुटुंबीय मूळचे कुंभारगावचे. मात्र, सुमारे 20 वर्षांपासून व्यवसायनिमित्ताने ते ताईगडेवाडी- तळमावलेत स्थायिक झालेले आहे. अनिल देसाई यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून, पत्नी सुवर्णा यांनी शिलाई व्यवसायाद्वारे कुटुंबाला साथ दिली आहे. श्री महालक्ष्मी शिवण क्‍लासद्वारे अनेक महिलांना स्वबळावर उभे करण्याचे काम देसाई यांच्या माध्यमातून परिसरात सुरू आहे. सध्या देसाई कुटुंबीय दैनंदिन घरगुती कामातून आवर्जून वेळ काढून सर्वसामान्यांसाठी शिलाई मशिनवर मास्क तयार करण्यात व्यस्त आहेत.

कोणताही मोबदला न घेता देसाई दांपत्य आणि त्यांची मुले निशा आणि शंभूराज या कामाद्वारे बांधिलकी जपत आहेत. शिवसमर्थ समूहाचे संस्थापक ऍड. जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या या उपक्रमाचे परिसरातून सध्या मोठेच कौतुक सुरू आहे. दिवसभरातील मोकळ्या वेळेत देसाई कुटुंबीय दिडशे मास्क तयार करतात. त्यासाठी लागणारे कापड, लेस व अन्य साहित्य त्यांना शिवसमर्थकडून पुरवले जाते. हे तयार झालेले मास्क शिवसमर्थ परिवार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवत त्यांच्यात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करत आहे. 


मास्क तयार करणे हा आमच्यासाठी नवीनच प्रकार होता. मात्र, शिवसमर्थ समूहाचे संस्थापक ऍड. जनार्दन बोत्रे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे आम्ही तो सहज आत्मसात केला. सामाजिक कार्याला आमचाही थोडाफार हातभार लागत असल्याचे समाधान आहे.'' 
- सुवर्णा देसाई 


सातारा जिल्ह्यातील नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT