पश्चिम महाराष्ट्र

कामाचं रोजचं रहाटगाडगं म्हणजे जिंदगी नसते राव

सकाळ वृत्तसेवा

सातारा : घराच्या सोप्यात... बंगल्याच्या हॉलमध्ये... परिसरातील झाडाच्या दाट सावलीत... कोठे बुद्धिबळाच्या पटावरील प्यादी फिरू लागली, तर कोठे पत्त्यांचे डाव रंगले, कॅरमच्या बोर्डवरील सोंगट्या सरू लागल्या, तर कोठे बालचमू वाचनात रंगून गेले...कोठे अगदी काचाकवड्यांचे खेळही चांगलेच रंगले....
 
कोरोना व्हायरसच्या विरोधातील युद्धात आजी-आजोबांपासून ते शाळकरी नातवंडांपर्यंतच्या समस्त नागरिकांनी प्रशासनाला समर्थ, मनापासून कृतीने साथ दिली. त्यामुळेच जिल्ह्यातील कोणत्याही गावातील रस्त्यावर माणसेच काय चिटपाखरूही पाहायला मिळाले नाही. कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या कर्फ्यूला सर्व नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. या कर्फ्यूमुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती कधी नव्हे त्या घरात एकत्र आल्या. कालपासूनच उद्या नेमके काय करायचे, याचे मनसुबे सुरू होते. आज सकाळी बहुतेक घरात गृहिणी स्वयंपाक, धुण्या-भांड्यांची कामे करत होत्या. शाळकरी मुले काही ना काही लुडबुड करत राहिली, तर ज्येष्ठ लोक वृत्तपत्र वाचनासह मोबाईल, दूरदर्शनच्या बातम्यात गुंतून गेले होते. सकाळची जेवणं झाल्यानंतर मात्र सर्वांनाच मोकळा वेळ होता.

या काळात अनेकांनी आपल्या या छंदांना आवडीला वाट करून दिली. छोटी मुले पत्ते खेळण्यात रमली. बऱ्याच घरात कॅरमचे डाव पडले. कुटुंबातील थोडी मोठी मुले-मुली बुद्धिबळाच्या खेळात रमून गेली होती. मुलांच्या कॅरमच्या खेळात अनेक कुटुंबात त्यांना ज्येष्ठांनी साथ दिल्याचे दिसत होते. काही बंगल्याच्या हॉलमध्ये कुटुंबातील महाविद्यालयीन तरुण, नोकरदार मुले, माणसे त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोके चालवत होती आणि गृहिणींनी आपला वेळ वाचनात किंवा काही नवनवीन पदार्थ बनविण्यात घालविला. 
कुटुंबातील मुले, नातवंडे, सुना एकत्र राहून हसत-खेळत आहेत, गप्पांत रंगलेली आहेत, हे पाहून आज कुटुंबातील त्यांच्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान विलसले होते. इतर दिवशी वेळ कसा घालवायचा, या विवंचनेत असलेल्या ज्येष्ठांना घरातील चित्र पाहून आगळे समाधान मिळाले. कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करतानाही आज नागरिकांनी आनंद शोधला.
 
ग्रामीण भागात नागरिकांचा या कर्फ्यूला पूर्ण प्रतिसाद मिळाला. शेतातील निकडीची कामे करण्यासाठी काही जण शेतात गेलेही; पण बहुतेकांनी घरात थांबणे पसंत केले. ग्रामीण भागातील मुलांनीही काचाकवड्या, लगोरी यांसारख्या खेळाचे डाव मांडले होते. तर अनेक गृहिणी आणि नागरिकांनी गुढीपाडव्यासाठी घराच्या स्वच्छतेची कामे करून घेतली. 

Coronavirus : प्रतिक्षा संपली; सातारकरांसाठी गुड न्यूज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT