wholl family corona suspected 
पश्चिम महाराष्ट्र

जामखेडला अवघे कुटुंबच कोरोनाने बाधले

वसंत सानप

जामखेड : परदेशातून आलेल्या कोरोनाबाधितांमुळे जामखेडकरांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना प्रशासन आवाहन करते आहे. मात्र, कोणीच माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटायचे नाव घेत नाही.

कोरोना काही केल्या जामखेडकरांची पाठ सोडताना दिसत नाही. आज आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन दिवसांपूर्वी "पॉझिटिव्ह' अहवाल आलेल्या मुलीचे आई-वडील व चुलत्याचा या तिघांमध्ये समावेश आहे. त्यामुळे अख्खे कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे. 

जामखेडला कोरोनाबाधितांची संख्या 17वर पोचली आहे. रोज होत असलेली वाढ या कॉलनीतील रहिवाशांसह जामखेडकरांची झोप उडविणारी ठरते आहे. कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढत आहे. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा तपास करून त्यांना लगेच तपासणीसाठी नगरला पाठविले जाते.

गेल्या महिनाभरापासून हे सुरू आहे. कोरोनामुक्तीसाठी विविध उपक्रम राबविलेल्या राज्यातील शहरांचा पॅटर्न येथे राबविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित वाढत असल्याने जामखेडकरांच्या लॉकडाउनची मुदतही आपसूकच वाढते आहे. हे थांबविण्यासाठी निश्‍चित "ऍक्‍शन प्लॅन' हाती घेणे आवश्‍यक आहे. येथील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास जामखेडला जोडणाऱ्या शेजारील चारही जिल्ह्यांनाही धोका पोचू शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT