dhalgaon dagade family.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

प्रकाशयात्री रमेशच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे जीवन अंध:कारमय

सकाळवृत्तसेवा

ढालगाव (सांगली)- कदमवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील कंत्राटी विज कर्मचारी रमेश आनंदा दगडे (वय 41) याचा कामावर असताना दोघा ग्राहकांच्या मारहाणीत नुकतेच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रमेशचे कुटुंब उघड्यावर आले आहे. 

रमेश हा महावितरणमध्ये आणि परिसरात रमूआण्णा नावाने परिचित होता. वीस वर्षापासून मजुरी करत होता. काही दिवस एका खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणूनही काम केले आहे. हे करताना तो वायरींगची कामे करत होता. त्यामुळे शेतकरी विजेच्या किरकोळ कामासाठी बोलवत असत. गावातला खासगी वायरमन म्हणून तो काम करू लागला. दीड एकरची कोरडवाहू शेतजमिन आहे. दोन भाऊ, आई, वडिल, दोन लहान मुले असा त्याचा संसार. मोठा भाऊ असल्याने कर्ता पुरुष म्हणून रमेशवरच जबाबदारी होती. दुष्काळामुळे शेतीत काही पिकतच नव्हते. 
चार वर्षापासून रमेश महावितरण कंपनीकडे कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता. तुटपुंज्या पगारावर नोकरी करतानाही समाधानी होता. महिन्याला काही रक्कम येत असल्यामुळे संसाराचा गाडा पुढे ढकलला जायचा. 

दुचाकी नसल्यामुळे तो सायकलवरुन सर्व कामे करायचा. गरजू शेतकरी त्याला दुचाकीवरून घेऊन जाऊन परत आणून सोडायचे. रात्री-अपरात्री कधीही सहकारी किंवा शाखा अभियंता, ग्राहकांनी बोलवले की तत्पर जायचा. परिसरातील लोकांसाठी अंधार दूर करणारा प्रकाशयात्री होता. 
अधिकाऱ्या सांगण्यावरून 28 एप्रिलला शेतीपंपाच्या विज ग्राहकाकडे तक्रारीचे निवारण करण्यासाठी तो गेला. तिथे दोघा ग्राहकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतरांसाठी प्रकाशयात्री असलेला रमेश गेल्यामुळे कुटुंबाचे जीवन अंध:कारमय बनले आहे. 
 

""वीज वितरण कंपनीकडून कंत्राटी कामगारांवर नेहमीच अन्याय होतोय. कंपनीने रमेशला मदत केली पाहिजे यासाठी पाठपुरावा करत आहोत. आरोपींना पुढे शिक्षा होईलच. परंतू सध्या गरज आहे ती कुटुंबाला सावरण्याची. त्यामुळे रमेशची पत्नी वंदना दगडे यांच्या बॅंक ऑफ इंडीया, शाखा : ढालगाव येथे बॅंक खाते A/C No :151718110001209, IFSC Code : BKID0001517 वर मदत करावी.'' 
-सुनिल वाघमारे (राज्य संघटक, राष्ट्रवादी वीज कामगार मजदूर संघटना) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT