family rescued after nine years 
पश्चिम महाराष्ट्र

नऊ वर्ष डांबून ठेवलेल्या कुटुंबाची सुटका

मार्तंड बुचुडे

पारनेर : मावळ (जि. पुणे) तालुक्‍यात शेतकऱ्याने तब्बल नऊ वर्षे वेठबिगार म्हणून डांबून ठेवलेल्या पळशी (ता. पारनेर) येथील कुटुंबाची नुकतीच सुटका करण्यात आली. या कुटुंबाला आधार कार्ड, रेशन कार्ड मिळवून देऊन, संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करण्याचे आश्‍वासन तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज दिले, तसेच त्यांच्या नावे घरकुलाचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचा आदेश पळशीच्या सरपंचांना दिला. 

याबाबत माहिती अशी ः दुष्काळी स्थितीमुळे पळशी (ता. पारनेर) येथील संदीप काळे, सुरेश काळे व सावळेराम काळे 2011मध्ये धामणी (ता. मावळ, जि. पुणे) येथे हनुमंत मारुती गराडे यांच्याकडे मजुरीसाठी गेले होते. तेथे गेल्यावर गराडे याने त्यांना कामाला जुंपले ते कायमचेच. गेल्या नऊ वर्षांत त्यांना एकदाही सुटी दिली नाही. नातेवाइकाचे लग्न असो, की अत्यंविधी, त्यांना गावाकडे येऊच दिले नाही. सकाळी सातपासून रात्रीपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतले जाई. केवळ पाचशे रुपये जोडी याप्रमाणे पगार दिला जाई.

गेल्या तीन वर्षांत तर जोडीला केवळ अडीचशे रुपये रोज दिला जात होता. "आम्ही आजारी पडलो, तरीही कधीच सुटी मिळाली नाही. आमच्याकडून कामात चूक झाली, तर मालक आम्हाला मारझोडही करत असे. तो अतिशय रागीट स्वभावाचा व गुंड प्रवृत्तीचा होता. आमची तेथून सुटका होऊन सुमारे पाच महिने झाले, तरीही आम्हाला त्याच्या धमक्‍या येत आहेत. आम्हाला भीती वाटत आहे,' असे संदीप काळे यांनी सांगितले. 

नऊ वर्षांत भाजीपाला माहीतच नाही : काळे 
संदीप काळे यांनी "सकाळ'ला सांगितले, की मालक आम्हाला खाण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य, डाळी व तेल-मिरची आणि साखर देत असे. नऊ वर्षांत आम्हाला भाजीपाला माहीतच नाही. या सर्व नरकयातनांतून सुटका झाली. मालक वेळेत पगार तर देत नव्हताच; शिवाय घेतलेल्या उचलीच्या रकमेवर 10 टक्के व्याज घेत होता. एकदा त्याच्या छपराला आग लागून एक जुनी दुचाकी आणि ट्रॅक्‍टर जळाला. त्याची भरपाईदेखील आमच्याकडून घेतली. आमच्या पगारातून पाच लाख रुपये कपात करून घेतले. 

धमक्‍यांबाबत गुन्हा नोंदविण्याची सूचना : देवरे 
तहसीलदार ज्योती देवरे यांनी "सकाळ'ला सांगितले, की मावळ तालुक्‍यातील संबंधित शेतकऱ्याने काळे कुटुंबासह जिल्ह्यातील बावीस जणांना वेठबिगार म्हणून डांबून ठेवले होते. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. वेठबिगारीतून सुटका झालेल्या काळे कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह रेशन कार्ड, आधार कार्ड आणि घरकुल देण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्यासाठी आम्ही आज काळे कुटुंबाची भेट घेतली. त्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा देण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यांना सध्या येत असलेल्या धमक्‍यांबाबत पारनेर पोलिसांना कल्पना देऊन, संबंधितांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT