Farmer double shears; Takari started, still no water 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी दुहेरी कात्रीत ; ताकरी सुरू, तरीही मिळेना पाणी 

रवींद्र मोहिते

वांगी : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन 12 दिवस झाले तरीही वांगी (ता. कडेगाव) परिसरातील बहुतांश पोटकालव्यांच्या टोकाला पाणीच पोहोचले नाही. आवर्तनाला उशीर आणि आता पाणीच पोहोचत नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. 

मागील महिन्यात 20 फेब्रुवारीला ताकारी योजनेचे दुसरे आवर्तन सुरू होऊन पाणी मुख्य कालव्यातून वाहू लागले. या आवर्तनाला सव्वा महिना उशीर झाल्याने पाण्याचा खडखडाट होऊन उभी पिके करपली होती. जमिनीतील पाणीपातळीत खालावल्याने कालव्यातून पाणी पुढेच सरकत नव्हते. सध्या योजनेचे एकूण 8 पंप सुरू आहेत. यापैकी 3 पंपांचे पाणी टप्पा 3 मधून "सोनहिरा' खोऱ्यातील गावांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कालव्यात केवळ 5 पंपांचेच पाणी वाहत आहे. सुरवातीपासून सर्व पोटकालव्यांची दारे खुली असल्याने कालव्यात पाण्याची उंची व दाब कमी आहे. 

कोणत्याही पोटकालव्यातून पुरेशा दाबाने पाणी वाहत नाही. त्यामुळे वांगी भागाला पाणी पुरविणाऱ्या वितरीका क्र.9,10,11,12,13 आणि 14 चे सिंचनक्षेत्र पूर्ण भिजलेले नाही. याच दाबाने पाणी राहिल्यास ते भिजणारही नाही. यापूर्वी योजनेचे एकूण 11 पंप सुरू केल्याशिवाय सर्व वितरिकांना भरपूर पाणी येत नसे. हा इतिहास अधिकाऱ्यांनी समजून घेऊन वितरणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा तासगाव तालुक्‍यात पाणी पोहोचायला किमान दोन महिने लागतील. 

ताकारी योजनेचे आणखी 3 पंप आजपासून सुरू केले जाणार आहेत. जेणेकरून पाणी गतीने आणि आवश्‍यक दाबाने वितरिकातून वाहेल. व सर्व शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळेल. सर्वांनी निश्‍चिंत रहावे. पाणी पुरेसे दिल्याशिवाय योजना बंद होणार नाही. 
- संजय पाटील, शाखाअभियंता (सिंचन), ताकारी योजना 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT