Farmer's unique Technic for protection from the leopards 
पश्चिम महाराष्ट्र

(व्हिडीओ) बिबट्यापासून संरक्षणासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) : बिबट्या वा अन्य हिंस्र श्‍वापदांपासून बचावासाठी माळवाडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने अनोखीच शक्कल लढविली. त्यामुळे हा शेतकरी परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. त्याचे सुरक्षाकवच पाहून सुरवातीला हसू येते. मात्र, त्यापासून आपला बचाव होत असल्याचे हा शेतकरी ठामपणे सांगतो. सध्या या शेतकऱ्याचा व्हिडोओ मोठ्या प्रमाणात "व्हायरल' होत आहे.

संतोष रामदास भाकरे (वय 36) असे या शेतकऱ्याचे नाव. पारनेर व शिरुर तालुक्‍यांच्या सीमेवरील माळवाडी हे गाव. सध्या या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. माळवाडी येथील शेतकरी संतोष भाकरे आपल्या चौघा साथीदारांसह रात्रीच्या वेळी गावाच्या स्मशानभूमीतील झाडांना पाणी देत होते. तेथे बिबट्याच्या पावलांची ठसे आढळून आल्याने त्यांच्या पोटात भीतीने गोळा आला. झाडांना पाणी देताना, एकमेकांसोबत गप्पा मारताना खूप रात्र झाली होती 

असा लागला शोध

काही दिवसांपासून बिबट्याने या भागातील शेळ्या-मेंढ्यांना लक्ष्य बनविले होते. त्यात चहूबाजूंनी ऊस नि उंच मक्‍याचे शेत. अशात वाघ किंवा बिबट्या येथे आला नि आपल्यावर हल्ला केला, तर काय करायचे, असा प्रश्‍न एकाने केला. त्याच वेळी संतोष भाकरे यांनी झाडाला पाणी देताना त्याची जाळी काढून अंगावर चढविली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की आता आपल्याला वाघ किंवा बिबट्याही काहीच करू शकणार नाही. लोखंडी जाळीमुळे त्यास हल्ला करता येणार नाही. आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यावर त्यांनी झाडाला पाणी घातले. त्यानंतर उसाला पाणी देण्याचे काम सुरू झाले. 

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर 
शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा जाळीचा व्हिडिओ तयार करून त्याचा प्रसार केला. त्यामुळे परिसरात रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी या जाळीचा वापर करायला सुरवात केली आहे. या जाळीमुळे शेतकऱ्यांना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली. वाघ व बिबट्या किंवा अन्य वन्य प्राण्यांपासून या जाळीमुळे शेतकऱ्याला संरक्षण मिळत आहे. या शेतकऱ्याला ऐनवेळी सुचलेल्या अफाट कल्पनेमुळे शेतकऱ्यांना एका वेगळ्याच सुरक्षा कवचाचा शोध लागला. वाघ, बिबट्यांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक वेळा त्याच्या भीतीमुळे शेतकरी घराबाहेर पडण्याचे टाळत होते. अशा वेळी या जाळीचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत रेल्वे आता स्लीपर कोचमध्ये, 'या' मार्गावर धावणार; पैसा आणि वेळेचीही होईल बचत

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून अपक्ष उमेदवाराला घरातच कोंडलं

Latest Marathi News Live Update : 'दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीत निर्णय घेतील' - सुनील टिंगरे

Navi Mumbai Crime : ऑनलाईन मैत्री ठरली जीवघेणी, दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण अन् मागितली २० लाखांची खंडणी

Bribery Action: बुलढाण्यात सहायक वनसंरक्षक व लिपिकाला १५ हजारांची लाच घेताना पकडलं, लाचलुचपतच्या कारवाईने खळबळ!

SCROLL FOR NEXT