karhad
karhad 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी शहरासह पाचवड येथे तीन टन निर्माल्य जमा केले. येथील प्रितीसंगमासह पाचवडेश्वर मंदिर, पाचवड फाटा येथून निर्माल्य व विसर्जनाचे पूजा साहित्य जमा केले आहे. त्याबाबतची बैठक होवून निर्माल्य जमा करण्याचे ठरले होते. त्यानुसार काल निर्माल्य जमा करण्यात आले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी गणेशोत्सवातील निर्माल्य व पूजा साहित्य जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथेही अभियान राबविण्यात आले. येथील दोन्ही ठिकाणी श्रीगणेश भक्तांकडील दोन हजार 300 किलो निर्माल्य जमा केले आहे. त्यानुसार ओला व सुका कचरा वर्गवारी करण्यात आली. प्लास्टिक पिशव्या, कापराचे डबे बाजूला काढण्यात आले. जमलेले निर्माल्य वर्गीकरण करून डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या धोंडेवाडी खत निर्मिती प्रकल्पास देण्यात आले.

खत बनविण्याचा येथील प्रकल्प येथे पूर्वीपासूनचे सुरू आहे. तेथे तयार होणारे खत प्रतिष्ठानच्या वृक्षारोपणाच्या ठिकाणी वापरण्यात येते. अभियानात कऱ्हाड परिसरातील शास्त्रीनगर, विद्यानगर, आगाशिवनगर व धोंडेवाडी, कोयना वसाहत, येळगाव, कोळे येथील सुमारे सत्तर सदस्यांनी सहभाग घेतला. डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठातर्फे निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम यापूर्वीही झाला आहे. उपक्रमाचे परिसरातून स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT