Filed a complaint about Corona posting on social media
Filed a complaint about Corona posting on social media 
पश्चिम महाराष्ट्र

CoronaVirus: म्हणून मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना नाव उच्चारलं तरी लोकांच्या मनात धडकी भरते आहे. कोरोनावर अद्यापि लस सापडली नसली तरी कोरोनाचे रूग्ण बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी रूग्णांनी प्रतिकारशक्ती वाढवल्यास त्यास कोणताच अपाय होत नाही. आरोग्य मंत्रलयातर्फेही हेच सांगितले जात आहेत. मात्र, वाट्टेल तशी माहिती सोशल मीडियात टाकून लोकांच्या मनात भीती निर्माण करीत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाग्रस्तांची नावे उघड केल्याने मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील संजीव पाखरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा.पौंडरोड,पुणे)  यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खबरदार... तुमचा व्हॉटसअॅप ग्रुप असेल किंवा तिकडे तुम्ही कोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली असेल तर आता तुमची खैर नाही. 

नगरमधील एक गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. जिल्हा रूग्णालयाच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्याने हे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी पुण्यातील आहे. त्याने कोरोनाची नावे सोशल मीडियात व्हायरल केली होती. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास झाला.

कोतवालीत दाखल झालेली फिर्याद पोलिस कर्मचाऱ्यानेच दाखल केली आहे. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोरोनाची तपासणी केंद्राची माहिती टाकली होती. त्यावरून तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांबाबत माहिती उघड केल्यास किंवा अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरीही काहींनी हा आदेश धुडकावून सा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

म्हणून व्हायरल

जे कोरोनाग्रस्त आहेत. त्यांची समाजाला माहिती मिळाली पाहिजे. त्यांच्यापासून शेजारी इतर लोक संपर्कात येऊ नये, या उद्देशानेच ती नावे जाहीर केली जावीत, अशी मनसेची भूमिका आहे. दुसऱ्याला संसर्ग होऊ नये म्हणूनच हे पाऊल उचलल्याचे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पोल्ट्री उद्योग अफवेचा बळी 
सोशल मीडियात कोणतीही सत्यता न तपासता केलेली पोस्ट एखाद्याचा जीव घेऊ शकते किंवा एखादा उद्योग लयाला नेऊ शकते. पोल्ट्रीबाबतही तसेच झाले. कोणीतरी कोंबड्यांमुळे कोरोना होतो असे सोशल मीडियात टाकले आणि या उद्योगाचे कंबरडे. ही अफवा आहे, असे माहिती असूनही हा उद्योग अजून सावरलेला नाही. 

े. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT