fire broke out factory in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

साखर झोपेत असतानाच भडकली आग अन्... 

सकाळ वृत्तसेवा

रायबाग (बेळगाव) - तालुक्यातील कुडची येथील साहेबलाल जी. रोहिले यांच्या राज अॅग्रो इंडस्ट्रीज व एसजीआर गृहोद्योग कारखान्यात आग लागली. त्यात सुमारे ५० ते ५५ लाखाचे नुकसान झाले. आज (ता. ३) पहाटे लागलेल्या आगीत कारखान्यातील मशिनरीसह कच्चामाल व तयार साहित्य खाक झाले. मात्र आगीमागील नेमके कारण समजू शकले नाही. 

याबाबत अधिक माहित अशी, येथील जमखंडी मार्गावर साहेबलाल जी. रोहिले यांचे राज अॅग्रो इंडस्ट्रीज व एसजीआर गृहोद्योग आहे. तेथे आज (ता. ३) आग लागली. पहाटे फिरायला गेलेल्या लोकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर आग विझविण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली. आगीने राैद्ररूप धारण केल्याने ती लवकर आटोक्यात आली नाही. रायबाग अग्निशामक दल व कुडची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. नागरिकही घटनास्थळी धावून आले. मात्र आग मोठ्या प्रमाणावर असल्याने अॅग्रो इंडस्ट्रीज व गृहोद्योग प्रकल्पातील मशिनरी, कच्चामाल व तयार माल असे सुमारे ५० ते ५५ लाखाचे नुकसान झाले. कुडची पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आग शॅार्टसर्किटमुळे की अन्य कारणामुळे लागली ते समजू शकले नाही. या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

रेवतीचं लग्न झालं म्हणून मुद्दाम पोस्ट केलीस का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर संतापला आदीश वैद्य; म्हणतो- तिला प्रेम मिळालं म्हणून...

Agricultural: पारंपरिक शेतीला पर्याय! कृषी क्षेत्रात ‘बिजली’ फुलांची क्रांती; शेतकऱ्यांसाठी कमाईचा नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

चेहऱ्यावर पराभवाचा लवलेशही नाही, हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावर हात ठेवून मस्त फिरतोय, चेन्नई विमानतळावरील Video Viral

SCROLL FOR NEXT