fire in cow house near shirala sangli five animals dead in fire 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : शिराळात गोठ्यास आग; 5 जनावरांचा होरपळून मृ्त्यू

सकाळ डिजिटल टीम

शिराळा (सांगली) : येथील शिराळा औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीतील यादव मळ्यातील तात्यासाहेब बाळू भांडवले यांच्या जनावरांच्या गोठ्यास आग लागून ५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये जनावरांचे शेड, पिंजर, शेती औजारे असे मिळून अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत आग विझविणाचे प्रयत्न सुरू होते.

घटनास्थळी असणाऱ्या शेडमध्ये लागलेल्या आगीत २ जातीवंत म्हैशी, १ वासरू, १ खिलार बैल, १ रेडी अशी ५ जनावरे भाजून मृत्युमुखी पडली आहेत. तसेच शेती औजारे, पिंजर, शेड पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विजविण्यासाठी रात्री परिसरातील पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test, 3rd Day: केएल राहुल शतकाच्या उंबरठ्यावर, पडिक्कलचेही अर्धशतक; लंचब्रेकपर्यंत काय घडलं?

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रंगणार, वैभव सूर्यवंशी मैदानात उतरणार; सामना कधी, कुठे, किती वाजता अन् Live कुठे पाहता येणार?

Tilak Varma Century: तिलक वर्माचा नेपाळवर तुफानी हल्ला! ११३ चेंडूंत ठोकलं बाहुबली शतक, चौकार-षटकारांच्या आतषबाजीने गोलंदाजांची दाणादाण

Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Solapur University : सोलापूर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील मुलींना तीन महिन्यांचे मोफत कराटे प्रशिक्षण; सत्र परीक्षेनंतर प्रशिक्षणाला सुरुवात

SCROLL FOR NEXT