First in the Anita Havldar state of Uplai 
पश्चिम महाराष्ट्र

उपळाईच्या अनिता राज्यात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द येथील अनिता दादा हवालदार राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. 

मूळचे चिखलठाण (ता. करमाळा) येथील रहिवासी असलेले हवालदार कुटुंबांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कामाच्या शोधात ते उपळाई खुर्द येथे 10 वर्षांपासून स्थायिक आहेत. अनिता यांचे आई-वडील शेती करतात तर भाऊ अमोल हा दूध व्यवसाय करतो.

परिस्थितीची जाण ठेवत अपार कष्ट

अनिता यांचे प्राथमिक शिक्षण चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द येथे झाले. अकरावी-बारावी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर येथे झाल्यानंतर सोलापुरातील दयानंद कॉलेज येथून "एलएलबी' व पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. घरच्या परिस्थितीची जाण ठेवत अपार कष्ट व मेहनत घेत वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी अनिता हवालदार यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम येत घवघवीत यश संपादन केले. 
हेही वाचा : धक्कादायक... "या' शहरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक 
आमच्या कष्टाचे चीज झाले

आम्ही अडाणी माणसं आहोत. मुलगी शिकतेय व अधिकारी व्हायचे म्हणतेय म्हणून जीवाचं रान करून आम्ही तिच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. आज तिची निवड झाली असून आमच्या कष्टाचे चीज झाले. 
- दादा हवालदार, अनिताचे वडील 

जिद्द आणि सातत्य ठेवल्यास यश दूर नसते. प्रत्येकाने लक्ष्य निश्‍चित करावे. ते मिळविण्यासाठी जिद्द ठेवून अभ्यास करावा. 
- अनिता हवालदार 
नूतन दिवाणी न्यायाधीश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT