इस्लामपूर (सांगली)- येणारा पाऊस आणि संभाव्य महापुराच्या धास्तीने वाळवा तालुक्यातील कणेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कणेगाव व भरतवाडी ही गावे अगदी वारणा नदीच्या कुशीत वसलेली आहेत. या गावांना वारणेच्या महापुराचा पहिला तडाखा 1953 साली बसला. त्यानंतर 1976, 1989, 2005 आणि गतवर्षी ऑगस्ट 2019 मध्ये महापूर आला. त्यामुळे कणेगाव व भरतवाडीचे पुनर्वसन कधी होणार? याची गावकऱ्यांना प्रतिक्षा आहे. शासनाने या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सन 1988-89 साली गावातील 9 हेक्टर 66 आर जमीन संपादित केलेली आहे. अद्याप प्लॉट वाटप करण्याची कोणतीही कारवाई झाली नाही. जून 2017 मध्ये विद्यमान सरपंच ऍड. विश्वासराव पाटील आणि सहकारी यांनी इस्लामपूर येथे उपोषण केले. तत्कालीन प्रांताधिकारी श्री. जाधव यांनी 6 महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी अश्वासनही दिले. अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पुनर्वसन मंत्रालयात 20 मार्च 2020 रोजी बैठक होणार होती. मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बैठक रद्द करून तहसीलदार रविंद्र सबनीस व प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 26 मार्च रोजी ग्रामसभा घेण्याची सुचना केली. तसेच ग्रामस्थांनी प्लॉट मागणी करण्यासाठी अर्ज करावेत, असे सुचीत केले. परंतु लॉकडाउनमुळे नियोजित विषय रद्द झाले. ऑगस्ट 2019 च्या महापुरामुळे गावकरी भयभीत झालेले आहेत. गावातील 134 घरांची पडझड, नुकसान झाले आहे. या लोकांना घर बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पुनर्वसन होईपर्यंत सदर लोकांना संपादित जागेत प्लॉट देण्यात यावेत, अशी मागणी तहसीलदार रविंद्र सबनीस व गटविकास विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच ऍड. विश्वासराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पाटील, अभिजीत पाटील, शिवराज पाटील, पांडुरंग पाटील, अशोकराव पाटील, पोपटराव शिंदे, शिवाजी पवार, अभिषेक पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
""पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. शासनाने याकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहिल्यास हा प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकतो. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी आणि सामान्य ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.''
-ऍड. विश्वासराव पाटील, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.