पश्चिम महाराष्ट्र

उजनी धरणात गुदमरतोय माशांचा जीव

राजाराम माने

केत्तूर (करमाळा) : उजनी जलाशयाच्या पाण्याने प्रदूषणाचा कळस गाठल्याने जलाशयातील मासे तसेच इतर जलचर यांचाही जीव गुदमरून चालला आहे. अगोदरच उजनी जलाशयाचे पाणी वरचेवर दूषित होत असल्याने जलाशयातील मत्स्यसंपदा, जैवसंपदा, पाणवनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर चालल्या आहेत. या गोड्या पाण्यातील विविध जातीच्या माशांचे अस्तित्व संपले आहे. जलाशयातील अनेक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. जलाशयात केवळ घाण पाण्यात राहणारा "चिलापी' जातीचा मासा सध्या सापडत आहे, तर यापूर्वी हमखास सापडणारे इतर जातीचे मासे मात्र अपवादानेच सापडत आहेत. 

गतवर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयाचा पाणीसाठा ऐतिहासिक अशा वजा 59 टक्केवर गेल्याने जलाशयातील मासे जवळजवळ संपले होते. सध्या जलाशय पाण्याने अथांग भरले असले तरी जलाशयात मच्छीमारांना मासे सापडण्याचे पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामध्येही घाण पाण्यामध्ये राहणारा चिलापी जातीचा मासा तेवढा सापडत आहे. सध्या जलाशयात माशांची आवक कमी प्रमाणात होत असल्याने त्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 

नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी उजनी जलाशयाजवळील गंगावळण (ता. इंदापूर) येथे काही कार्यक्रमानिमित्त भेट दिली असता त्यांनी उजनी जलाशयात फेरफटका मारला. त्या वेळी ग्रामस्थांनी दूषित पाण्याविषयी त्यांना सांगितले. या वेळी जलाशयात येणारे दूषित पाणी महाविकास आघाडीमार्फत रोखणार असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले. उजनीमध्ये शेवाळाने माशांना धोका नाही असा अजब दावा प्रदूषण मंडळाने केला आहे. उजनी जलाशयाला प्रदूषित पाण्याचा विळखा पडल्याने शेवाळाचे प्रमाण वाढले आहे. परंतु, हे शेवाळ धोकादायक नसून त्यामुळे माशांवर कुठलाही परिणाम होत नसल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला आहे. 

ठळक तपशील... 
- सध्या पाण्यावर सर्वत्र विषारी शेवाळाचा थर जमा झाल्याने पाण्याला हिरवा रंग आला. 
- माशाबरोबरच इतर जलचरांचाही श्‍वास गुदमरतो आहे 
- मासेमारी व्यवसायावर मोठा विपरीत परिणाम होत आहे 
- दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्याचा मच्छी व्यावसायिकांच्या शरीरावर विपरित परिणाम होत आहे 
- हिरवट पाण्यामुळे पाण्यातील जैवविविधतेवरही परिणाम 
- मत्स्यबीजांच्या होत असलेल्या कत्तलीमुळे जलाशयातील मासे मात्र संपत चालले 
- लहान जाळीच्या साह्याने मासेमारीमुळे विविध जातीचे छोटे-छोटे मासे नष्ट होत चाललेयत 
- प्रशासनाने जलाशयात मत्स्यबीज सोडून लहान मासेमारीवर बंदी घालण्याची मागणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT