five star finance company office robbery in sangli  
पश्चिम महाराष्ट्र

फायनान्स कंपनीतच चोरट्यांनी केले हात साफ

सकाळ वृत्तसेवा

 सांगली :  शहरातील विजयनगर चौकात असलेल्या फाईव्ह स्टार फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 5 हजार 169 रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी गौसमुद्दीन सादीक बेगमपल्ली (वय 27, रा. रामरहिम कॉलनी, शिंदे मळा, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
 विजयनगर चौकात फाईव्ह स्टार फायनान्स लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कार्यालय बंद करून कर्मचारी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व टेबलच्या लॉकमध्ये ठेवलेली एक लाख 5 हजार 169 रुपयांची रोकड पळविली. काल सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT