Akiwat gaon find their own way from flood 
पश्चिम महाराष्ट्र

अकिवाटने तयार केली पूरस्थितीतून वाट

संजय खूळ

अकिवाट : शिरोळ तालुक्यातील सधन गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकिवाट गावाला चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा बसला. तब्बल 12 हजार लोकवस्ती असलेल्या या गावाने पुरानंतर अत्यंत जिद्दीने काम करत पुन्हा गाव पूर्वपदावर आणले आहे. महापुराचे लवलेशही दिसत नाहीत, असा चेहरामोहरा या गावाने केला आहे.

शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीलगत असलेल्या अकिवाट गावात महापुरानंतर राहण्यासाठी दोनच ठिकाणे सुरक्षित होती. विद्यासागर हायस्कूल आणि जैन मंदिर टापू या ठिकाणी पाणी नव्हते. हा भाग वगळता संपूर्ण गाव पाण्याखाली होता. यापूर्वी पुराच्या स्थितीचा अंदाज घेऊन तब्बल 10 हजार नागरिक ठिकठिकाणी स्थलांतरीत झाले होते. मात्र, दोन हजार नागरिक गावामध्ये राहिले होते.

या नागरिकांच्या जेवण आणि आरोग्य सुविधा महत्त्वाच्या होत्या. या दोन हजार नागरिकांसाठी जेवणाची सुविधा देण्यासाठी साहित्याची आवश्यकता होती. पाण्याला प्रचंड वेग असल्याने पहिल्या काही दिवसांत कोणत्याच तुकड्या या भागात मदतीसाठी पोचत नव्हत्या. अशा वेळी रोटरी क्लबने बोटीद्वारे टाकळी येथून साहित्याची खरेदी करून नागरिकांना दिले. गावातील वैद्यकीय पथकाने विशेष सेवा बजावली.

गवाबरोबरच खिद्रापूर, राजापूर या ठिकाणच्या रूग्णांची सेवा व्हाईट आर्मीच्या सैनिकामार्फत केली. या वैद्यकीय पथकाने तब्बल 15 हजार रूग्णांची तपासणी केली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या गावामध्ये 200 कार्यकर्ते पाठविले होते. गावासाठी लागणारा निधीही त्यांनी जाहीर केला आहे. या कार्यकर्त्यामार्फत तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या स्वयंसेवकांच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविल्याने गावचा चेहरामोहरा बदलून गेला आहे.

संकटावर एकीने मात
गावासाठी अनेक संस्थांचे महत्वाचे योगदान लाभले. हर्षवर्धन पाटील यांनी गाव दत्तकच घेतले असून त्यांचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. गावाने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नातून आम्ही सहजपणे संकटावर मात केली.
- विशाल चौगुले, सरपंच अकिवाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

Video: दोन सेकंदांमध्ये 700 चा स्पीड! चीनने जमिनीवरील वेगाचा विक्रम मोडला; ट्रेनचा वेग तर बघा...

तरुणीचा प्रश्न अन् मुलांची भन्नाट उत्तरं; Viral Video एकदा बघाच, तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही...

SCROLL FOR NEXT