four people corona positive belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - बेळगावात तबलिगीतील आणखी चार जण कोरोना पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. 5) स्पष्ट झाले. त्यात तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. चौघेही कुडचीतील (ता. रायबाग) रहिवासी असून ते निझामुद्दीनमधील तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झाले होते. या चौघांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सात झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी (ता. 3) मरकजमधून परतलेल्या तिघांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारामुळे संसर्गाची भिती वाढली असून कुडचीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. 

निझामुद्दिनमध्ये मार्च महिन्यात झालेल्या मरकजमध्ये जिल्ह्यातील 67 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 32 जणांच्या घशातील द्राव तपासणीसाठी बंगळूरला प्रयोगशाळेला पाठविले होते. त्यापैकी 24 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. तर तिघांना कोरोना झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. तर सात जणांचा अहवाल प्रलंबित होता. त्यापैकी चौघांचे अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आले आहेत. चौघेही बाधित कुडचीचे रहिवासी आहेत. त्यात अनुक्रमे 36, 67 व 41 वर्षाच्या महिला तर एक 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांनी 13 ते 18 या काळात मरकजमध्ये सहभाग घेतला होता. सर्वजण 20 मार्च रोजी बेळगावात परतले होते. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकाचा अहवाल अद्याप मिळालेला नसून तो सोमवारी (ता. 6) मिळण्याची शक्‍यता आहे. 

रविवारच्या आकडेवारीनुसार मरकजमध्ये सहभागी झालेल्या 32 पैकी सात जणांना कोरोना झाला आहे. त्यापैकी तिघे बेळगाव तालुक्‍यातील आहेत. त्यांचा अहवाल शुक्रवारी मिळाला होता. त्यामध्ये कॅम्प बेळगाव, बागेवाडी व बेळगुंदीच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात रविवारी चौघांची भर पडल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सर्वजण कुडचीतील असल्याने तिथे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या परिसराला क्वारंटाईन झोन म्हणून घोषित करण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी सुरु केल्या आहेत. 

 
संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु 
कोरोनाचा संसर्ग झालेल्या चौघांचा किती जणांशी संपर्क आला होता, याचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते कुणाला भेटले? त्यांनी कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला आहे का? त्यांच्यामुळे कुणाला संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जात आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT