Takari Scheme Krishna River Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

Takari Scheme : 'ताकारी'चे चार पंप बंद करून पाणी सोडले कृष्णा नदीत; लाभक्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त

कृष्णा नदीपात्र (Krishna River) कोरडे पडल्याने ताकारी, टेंभू योजनेचे निम्मे पंप बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

सकाळ डिजिटल टीम

ताकारी योजनेच्या वाट्याचे या वर्षीचे ३.६ टीएमसी पाणी अद्याप उचलणे बाकी आहे. चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे.

वांगी : सांगलीजवळ कृष्णेचे पात्र कोरडे पडल्याने ताकारी योजनेचे (Takari Scheme) चार पंप बंद करून पाणी गुरुवारी (ता. १) सांगलीकडे कृष्णा नदीत सोडण्यात आले. मुख्य कालव्याचा प्रवाह मंद झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी (Farmer) धास्तावलेत. ‘ताकारी’च्या पाच पंपांचे पाणी तिसऱ्या टप्प्यातून सोनहिरा खोऱ्यात कायम सुरू ठेवले आहे. मुख्य कालव्याचे पाणी बंद झाल्याने अवलंबून असणारे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ताकारी लाभक्षेत्रातील मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे या वर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारी रोजी रात्री सुरू केले. पाण्याचा लाभ योजनेच्या १८ हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे. आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु सांगलीत टंचाई जाणवू लागल्याने व कृष्णा नदीपात्र (Krishna River) कोरडे पडल्याने ताकारी, टेंभू योजनेचे निम्मे पंप बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ताकारीचे सुरू असणारे नऊपैकी चार पंप बंद करून पाणी नदीत सोडले गेले. ताकारीचे सुरू असणाऱ्या उर्वरित ५ पंपांचे पाणी तिसऱ्या टप्प्यातून सोनहिरा खोऱ्यात सुरू आहे. मुख्य कालवा आटला आहे. १० दिवसांत मुख्य कालव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांतून चिंतेचा सूर उमटत आहे.

ताकारी योजनेच्या वाट्याचे या वर्षीचे ३.६ टीएमसी पाणी अद्याप उचलणे बाकी आहे. चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे. ताकारी उपसा सिंचन योजना सक्षमपणे कार्यरत असून योजनेचे आवर्तनही वेळेत मिळत आहे. पाणीपट्टी आकारणी व वसुली नियमित आहे. वीज बिल थकबाकीचा प्रश्न उद्‌भवत नाही.

सोडलेले पाणी मुख्य कालव्यातून १४४ किलोमीटरवर सोनी (ता. मिरज) येथे पोहोचवले जाणार आहे. सध्या कृष्णा नदीकाठावर टंचाई जाणवत असल्याने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश आहेत. दोन दिवसांत पुनश्चः ताकारी योजना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सर्व पोटकालव्यांना पुरेसे पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी गडबड करू नये.

-राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT