पश्चिम महाराष्ट्र

छानच की...अपघातविरहीत सेवेसाठी लालपरीची चतु:सुत्री 

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार 11 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. अपघातविरहीत सेवेसाठी लालपरीने आता चालकांना "प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य" या चतु:सुत्रीचे पालन करण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी केले आहे. 


रस्ता सुरक्षा मोहिमेत चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे. 
दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या 71 वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेतून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्‍वासार्हततेची भावना लालपरीने निर्माण केली आहे. या विश्‍वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये ही सुरक्षितता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे 34 हजार चालक कार्यरत आहेत. अपघाताची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. अपघात विरहित सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख बक्षिसे देऊन राष्ट्रीय सणाच्या दिवशी गौरवण्याचाही उपक्रम राज्य परिवहन महामंडळाने सुरु केला आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर समुपदेशनही करण्यात येत आहे. 

ठळक बाबी... 

  • 71 वर्षांची लालपरी दररोज 65 लाख प्रवाशांची करते वाहतूक 
  • राज्य परिवहन महामंडळाच्या 34 हजार चालकांचे आगारांमध्ये होणार समुपदेशन 
  • प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्तीवर भर 
  • गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातात घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT