framers worried due to less weight of grapes 
पश्चिम महाराष्ट्र

तासगावात वजन कमी असल्याने द्राक्षोत्पादक चिंतेत

रवींद्र माने

तासगाव : द्राक्ष हंगामाने आता वेग पकडला आहे. द्राक्षांचे वजन कमी भरत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. थंडीमुळे द्राक्षात साखर भरण्याचा वेग कमी आहे. वजनावर परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदार थंडी कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

यावर्षीचा द्राक्ष हंगाम सुरुवातीपासून समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. संकटांची ही मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्याचा हंगाम दोन महिने उशीरा सुरू झाला. कशाबशा वाचलेल्या द्राक्षबागातील द्राक्ष सुरू झाली आहेत. त्या द्राक्षांचे वजन कमी भरत असल्याच्या नव्या समस्येने बागायतदार वैतागले आहेत. 

दर चांगले ! द्राक्षे दिसायला हिरवीगार, टप्पोरी ! मात्र अंदाजापेक्षा वजन कमी ! असा अनुभव येत असल्याने बागेतील द्राक्षे लगेच काढण्यापेक्षा आणखी दहा पंधरा दिवस थांबावे. द्राक्षांत साखरेचे प्रमाण वाढले तर वजन वाढेल, अशी भूमिका बागायतदार घेत आहेत. 

सद्या थंडीचे प्रमाण अधिक आहे. थंडी असल्याने द्राक्षातील साखरेचे प्रमाण कमी आहे. जेवढे साखरेचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणात वजनही वाढते. सध्या द्राक्षाचे वजन कमी भरण्यामागे हे एक कारण आहे. तसेच सलग झालेल्या पावसाचा परिणामही द्राक्षांचे वजन कमी भरण्यात झाला आहे. कृत्रिम उपायांनी द्राक्षांचा आकार वाढला. पण द्राक्षांत गर कमी असल्यानेही कमी वजनाची समस्या भेडसावत असल्याचे तज्ञांचे मत आहे. सध्या तरी द्राक्षांत साखर (शुगर) भरण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

वजन आणि उत्पादनही घटले 

नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या ज्या बागेतून दोन हजार पेटी द्राक्षे मिळतील, असा अंदाज असेल तर त्यातून वजन कमी भरल्याने 1200 -1300 पेटी द्राक्ष निघत आहेत. हा अनुभव जवळ जवळ सर्व शेतकऱ्यांना येतो आहे. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT