इस्लामपूर ः व्यवसायासाठी कागद पुरवतो असे सांगून 5 लाख 19 हजार 200 रुपयांची फसवणूक करणाऱ्या राज दिनेश पंडीत (वय 31, घोटी, ता. इगतपूरी, जि. नाशिक) याला 30 मार्च पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायलयाने आज दिला. अधिक आकाराम देशमुख (बहे, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की अधिक देशमुख बीटुबी पेपरचा व्यवसाय सुरु करणार असल्याने त्यांनी नातेवाईक आकाश बापुराव भालेकर यांच्यामार्फत घोटी (ता. ईगतपुरी, जि. नाशिक) येथे राहणाऱ्या राज दिनेश पंडीतशी संपर्क साधला. राज पंडीतने पेपर पुरवतो, असे सांगून पैसे पाठवण्यास सांगितले. देशमुख यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी दहा हजार रुपये मोबाईल बॅंकींगद्वारे राज पंडीत यांच्या केडीआर लिसा ग्लोबल निड ट्रेडर्सच्या कॅनरा बॅंकेतील खात्यावर पाठवले. त्यानंतर माल येण्याआधीच कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन झाले. माल पोहोचू शकला नाही. त्यानंतर जून 2020 मध्ये लॉकडाउन उठल्यानंतर पंडीत यांच्याशी संपर्क साधून माल पाठवण्यास सांगितले असता त्याने
आणखी जास्त माल घ्यावा लागेल, असे उत्तर दिले. देशमुख यांनी पुन्हा पत्नी वैशाली यांच्या खात्यावरुन राज पंडीतच्या खात्यावर 3 लाख 75 हजार तसेच स्वतःच्या सिध्दी डीजीटल आर्टसच्या खात्यावरुन 1 लाख 69 हजार 200 रुपये राज पंडीतच्या खात्यावर पाठवले. राज पंडीतने 24 जून 2020 रोजी माल येईल, असे सांगितले. परंतु दिलेल्या वेळेस गाडी न आल्याने देशमुख यांनी राज पंडीतकडे चौकशी केली. गाडी येत आहे, तुमच्याजवळ एक आठवड्यात पोहोचेल, असे सांगितले.
गाडी न आल्याने देशमुख यांनी पंडीतकडे पैसे परत मागितले. त्याने "तुम्हाला पैसे पाठवतो. तुमचा अकांउट नंबर द्या' असे सांगितले. देशमुख यांनी खाते क्रमांक दिला. मात्र आजअखेर त्याने पैसे पाठवले नाहीत. पैशाची मागणी केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगुन पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास करत संशयित राज पंडीतला काल अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता त्याला 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.