A fraudulent fund of players under the name of 'Youth Kabaddi League' 
पश्चिम महाराष्ट्र

युवा कबड्डी लीग'च्या नावाखाली खेळाडूंच्या फसवणुकीचा फंडा 

घनशाम नवाथे

सांगली : राज्यात "युवा कबड्डी लीग'च्या नावाखाली खेळाडूंची निवड प्रक्रिया बेकायदापणे सुरू आहे. खेळाडूंची आर्थिक लूट करण्याचा हा फंडा आहे. राज्यात इतर ठिकाणी निवड प्रक्रिया बंद पाडून पोलिस तक्रार केली आहे.

सांगली जिल्ह्यात दुधोंडी (ता. पलूस) येथे 6 रोजी बेकायदापणे निवड प्रक्रिया होत आहे. याविरोधात पलूस पोलिस ठाण्यात आणि प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा सचिव नितीन शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""महाराष्ट्रात कबड्डी खेळाडूंची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे अशा संधी न मिळालेल्या खेळाडूंना कबड्डी लीगचे आमिष दाखवून फसवण्याचा फंडा इतर राज्यातील काहीजण करत आहेत. यापूर्वी कबड्डी लीगच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हा फंडा राज्यात आणला आहे. युवा कबड्डी लीगच्या नावाखाली राज्यात विविध ठिकाणी निवड प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम आखला आहे. परंतु यासाठी राज्य संघटनेची कोणतीही मान्यता घेतली नाही. "कोवीड 19'च्या पार्श्‍वभूमीवर स्पर्धा घेण्यास परवानगी नसताना देखील लीगच्या नावाखाली निवड प्रक्रिया राबवली जात आहे.'' 

ते पुढे म्हणाले,""लीगमध्ये प्रत्येक खेळाडूकडून पाचशे रुपयांची मागणी केली आहे. परंतु स्पर्धा किंवा अन्य कोणताही कार्यक्रम ठरवला नाही. खेळाडूंना लिलावानंतर खात्यात पैसे जमा होतील असे आमिष दाखवले आहे. या लीगमध्ये खेळाडूंना कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही. तसेच त्यांची कोणतीही नोंद होणार नाही. पैसे उकळण्याचा हा धंदा आहे. राज्यात अनेक ठिकाणी या लीगसाठीची निवड चाचणी बंद पाडून पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. सांगलीतील निवड चाचणी बेकायदा असून, यामागे आर्थिक घोटाळ्याचा उद्देश आहे. जिल्ह्यात दुधोंडी येथे 6 डिसेंबरला निवडीचा घाट घातला आहे. याविरोधात पलूस पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.'' यावेळी अजित भोसले आणि कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

खेळाडूंनो सावध रहा 
युवा कबड्डी लीग ही बेकायदा स्पर्धा आहे. यामध्ये खेळाडूंनी सहभागी होऊन नुकसान करून घेऊ नये. तरीही खेळाडू सहभागी झाल्यास त्यांच्यावर भविष्यात कारवाई होऊ शकते, असा इशारा पदाधिकारी यांनी दिला. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT