Indian-Train 
पश्चिम महाराष्ट्र

अबब...'या' विभागात फुकट्या प्रवाशांनी भरला 155 कोटींचा दंड

तात्या लांडगे

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील फुकट्या प्रवाशांकडून जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत तब्बल 155 कोटी 14 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोलापूर विभागातून जाणाऱ्या मेल एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचा मोठा सहभाग आहे. 

2018 च्या तुलनेत दंडाची रक्‍कम 12 कोटी 20 लाख रुपयांनी वाढली आहे. डिसेंबर महिन्यात दोन लाख 33 हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर 2019 या वर्षात 29 लाख 89 हजार प्रवाशांवर कारवाई करीत हा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. व्यक्‍ती व त्यांच्याकडील साहित्याचे तिकीट न काढल्याच्या प्रकरणांमधून हा दंड संबंधित प्रवाशांकडून वसूल केला आहे. 



यशवंतपूर- लातूर एक्‍स्प्रेसला दोन वाढीव डबे 
सोलापूर विभागावर प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने आता यशवंतपूर- लातूर- यशवंतपूर एक्‍स्प्रेसला दोन डबे कायमस्वरुपी वाढविण्याचा निर्णय दक्षिण पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 15 जानेवारीपासून 21 डब्यांसह ही रेल्वे धावणार आहे. यशवंतपूर- लातूर एक्‍स्प्रेसला यापूर्वी 19 डबे होते. आता ही एक्‍स्प्रेस रेल्वे 15 जानेवारीला यशवंतपूरहून तर 16 जानेवारीला लातूरहून 21 डब्यांसह धावणार आहे. नव्या निर्णयानुसार आता या रेल्वेला दोन ब्रेकयान, सहा जनरल डबे तर सहा स्लिपर, तीन एसी थ्री टियर, एक एसी टू टियर व प्रथम श्रेणीचा एक डबा असणार आहे. दक्षिण पश्‍चिम रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार यशवंतपूर- लातूर मार्गावरील प्रवाशांची सोय झाली आहे. तसेच ओखा- तुतीकोरीन- ओखा एक्‍स्प्रेसलाही एक एसी थ्री टियर डबा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असून प्रवाशांचीही गैरसोय टळेल, असा विश्‍वास रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT