shaving
shaving 
पश्चिम महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या मोफत दाढी-कटिंग उपक्रमाची वीस वर्षे 

परशुराम कोकणे

सोलापूर : शेगावहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी पायी दिंडीतील वारकऱ्यांची मोफत दाढी-कटिंग करून संतसेना नाभिक दुकानदार संघटनेने सेवा विठ्ठलाची चरणी अर्पण केली. दिवसभरात पाचशेहून अधिक वारकऱ्यांना ही सेवा देण्यात आली. गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे ही सेवा देण्यात येत असल्याचे समाजाचे नेते पांडुरंग चौधरी यांनी सांगितले. 

उपलप मंगल कार्यालयाच्या परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत दाढी-कटींगचा स्टॉल उभारण्यात आला होता. दिवसभरात पाचशेहून अधिक वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. महापौर शोभा बनशेट्टी, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी उपक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष भारत क्षीरसागर, दुकानदार संघटनेचे संतोष धोत्रे, राकेश शिंगीकर, शरणू हडपद, सुरेश हडपद, वैभव शेटे, मोहन जमदाडे, श्रीकांत राऊत, गोवर्धन कोडपाक, संजय चिखले, शेखर कोंडापुरे, ज्येष्ठ सदस्य पांडुरंग चौधरी, अभयकुमार कांती आदी उपस्थित होते. 

दुकान बंद करून नाभिक बांधवांना पंढरीच्या वारीला जाणे शक्‍य नाही. पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करून एक वेगळे समाधान मिळते. गेल्या वीस वर्षांपासून ही सेवा देण्यात येत आहे. 
- पांडुरंग चौधरी, 
ज्येष्ठ सदस्य, नाभिक समाज 

वारकऱ्यांच्या चपला, बुटांची दुरुस्ती 
सामाजिक कार्यकर्ते भानुदास शिंदे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांची पथिक सेवा करण्यात आली. वारकऱ्यांच्या चपला, बूट दुरुस्ती आणि पॉलिश करून देण्यात आले. स्वाभिमानी चर्मकार महासंघ आणि शिंदे परिवाराच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश तुपसमुद्रे, शहराध्यक्ष परशुराम मब्रुखाने, सुरेश मोडे, युवराज शिंदे, संजय राऊत, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT