पश्चिम महाराष्ट्र

साठ हजार शिक्षकांचे शुक्रवारकडे लक्ष 

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. परंतु, 2005 पूर्वी सेवेत लागलेल्या परंतु अंशतः अनुदानित असलेल्या शाळेवरील शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. त्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी नेमलेल्या समितीची बैठक शुक्रवारी (ता. 10) होत आहे. या बैठकीकडे राज्यातील 60 हजार शिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. एक नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या जवळपास 60 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही नवीनच अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. 2005 पूर्वी सेवेत लागूनही त्यांना नवीन पेन्शन योजना लागू करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. याची प्रचिती शिक्षक आमदारांना आल्यानंतर त्यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर पायी दिंडी मोर्चा काढला. त्या मोर्चाची दखल घेत सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी (ता. 10) होणार आहे. त्या बैठकीपूर्वी शिक्षण विभागाने त्यांची सगळी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने यापूर्वी दिलेला नमुना संदिग्ध होता. त्यामुळे पुन्हा नव्याने नमुना तयार करून 2005 पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांची माहिती संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. ही सगळी माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर ती शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपुढे मांडली जाणार आहे. 

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या शिक्षकांच्या संदर्भात शासनाने कोणता निर्णय घ्यावा याबाबत चर्चा होऊन ही समिती सरकारला शिफारस करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शिक्षण विभागाने 2005 पूर्वीच्या शिक्षकांची माहिती 10 मुद्यांमध्ये मागितली आहे. त्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती दिनांक, प्रथम अनुदान आलेली तारीख, प्रथम अनुदानाचे प्रमाण, प्रथम अनुदान घेतेवेळी त्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, एक महिन्याचा आर्थिक भार या मुद्यांचा समावेश केला आहे. 

शिक्षक आमदारांचा पुढाकार 
राज्यातील शिक्षक आमदारांनी पुढाकार घेत या 60 हजार शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी वर्धा ते नागपूर अशी पायी दिंडीही काढली आहे. त्यामुळे याबाबत निश्‍चितच सकारात्मक निर्णय होण्याची 60 हजार कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या परीक्षेत गडबड, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अडवली न्यायाधीशांची गाडी

SCROLL FOR NEXT