Friendship of Nagnath Anna Nayakwadi Mulayam Singh Yadav national level sangli 
पश्चिम महाराष्ट्र

नायकवडी-यादव यांची राष्ट्रीय स्तरावर गाजलेली मैत्री

मुलायमसिंह यांचे सांगलीत दौरे : कष्टकरी, कामगारांसाठी दोन्ही नेत्यांचा हातात हात घालून संघर्ष

महादेव अहिर

वाळवा : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत मुलायमसिंह यादव आणि हुतात्मा उद्योग समूहाचे घनिष्ठ संबंध होते. हुतात्मा उद्योग समूहाचे संस्थापक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, मुलायमसिंह यादव यांची मैत्री राष्ट्रीय पातळीवर गाजली होती. डाव्या विचारसरणीचे हे दोन नेते वैचारिक पातळीवर एकत्र आले होते. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे सरकार त्यांना अभिप्रेत होते, म्हणून हे दोन्ही नेते हातात हात घालून संघर्ष करत होते.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व मुलायमसिंह यादव यांची एकजूट नव्वदच्या दशकात झाली. नंतर समाजवादी पक्षाच्या वतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. यादव यांनी प्रचारसभाही घेतल्या. नंतर सांगली लोकसभा मतदारसंघात यादव यांनी निवडणूक प्रचारही केला. क्रांतिवीर नायकवडी यांनी काही काळ समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. समाजवादी पक्षाच्या वतीने झालेल्या प्रत्येक घडामोडीत मुलायमसिंह व नागनाथअण्णा यांचा सहभाग होता. समाजवादी पक्षाच्या वतीने दिल्ली येथे निघालेल्या मोर्चात नागनाथअण्णा हजार कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. हुतात्मा दूध संघाच्या मान्यतेसाठी यादव यांनी स्वतः प्रयत्न केला. हुतात्मा उद्योग समूहाची व यादव यांची वैचारिक नाळ अखेरपर्यंत मजबूत होती. नागनाथअण्णा नायकवडींच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला यादव प्रमुख पाहुणे होते.

यादव यांच्या निधनाने हुतात्मा उद्योग समूहात शोकलहर पसरली. उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी तातडीने लखनौला प्रस्थान केले. वैभव नायकवडी यादव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत. ते म्हणाले, ‘‘मुलायमसिंह यादव व नागनाथअण्णा नायकवडी यांनी सामान्य जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. बळीचे राज्य यावे, यासाठी ते नेहमी झगडले. यादव यांच्या निधनाने समाजवादी विचारसरणीचे मोठे नुकसान झाले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT