The front of the whole society 
पश्चिम महाराष्ट्र

नागरिकत्व कायद्याविरोधात समस्त समाजाचा महामोर्चा 

सकाळ वृत्तसेवा

नगर : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर गदारोळ सुरू आहे. आंदोलनाचा जोर अजूनही कमी झाला नाही. त्याचा प्रत्यय आज नगर शहरात आला. समस्त जागरूक समाजातर्फे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. विविध संघटनांचा सहभाग असलेल्या मोर्चात मुस्लिम नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. या कायद्याद्वारे होणारा अन्याय रोखण्यासाठी राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. 

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात राजी-नाराजीचे वातावरण आहे. जिल्ह्यातही विविध ठिकाणी या कायद्याला विरोध दर्शविणारे मोर्चे निघत आहेत. समस्त जागरूक समाजातर्फे आज नागरिकत्व कायद्याविरुद्ध मोर्चाची हाक देण्यात आली.

कोठला मैदान येथून हा मोर्चा निघाला. औरंगाबाद रस्त्याने जीपीओ चौकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन सुपूर्द केले. या शिष्टमंडळात राष्ट्रपुरुषांच्या वेशातील लहान मुलांचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे, की नागरिकत्व कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांतील छळ होत असलेल्या अल्पसंख्याकांच्या आश्रयासाठी धर्माचा कायदेशीर निकष म्हणून उपयोग केला जातो. 

घोषणांनी परिसर दणाणला 
इन्कलाब जिंदाबाद, इस देश के चार सिपाही हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, संविधान बचाओ... देश बचाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. उलेमा ए हिंद, संभाजी ब्रिगेड, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, बामसेफ, जमाते ईस्लाम ए हिंद, तबलीक जमात ए हले सुन्नत ए जमात, वाहदाते ए ईस्लामी, रझा अहमद अकादमी या संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 

वाहतूक कोंडीमुळे पोलिसांचे नाकीनऊ 
कोठला येथून दुपारी दोननंतर निघालेला मोर्चा चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला. या वेळी स्टेशन रोड ते औरंगाबाद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 
मोर्चासाठी सकाळी नऊपासूनच मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. मोर्चावर पोलिसांचे दुर्बिणीतून बारीक लक्ष होते. दंगल पथकाचे वज्र वाहनही सज्ज होते. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT