trees
trees 
पश्चिम महाराष्ट्र

माण-खटावमध्ये फळझाडांनी फुलणार परसबागा

रुपेश कदम

मलवडी - माणदेशाने जलसंधारणाचे अनन्यसाधारण काम केले आहे. आता डोंगर रांगा हिरव्यागार करण्यासोबतच घरोघरी फळझाडे लावून परसबाग फुलविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

ड्रीम सोशल फाऊंडेशन, माणदेश फाऊंडेशन आणि माणदेशी फाऊंडेशनच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रीन माण-खटाव कार्यक्रमातंर्गत माण तालुक्यातील पुकळेवाडी, कारखेल आणि गाडेवाडी गावातील सुमारे साडेपाचशे कुटुंबांना सुमारे तीन हजार रोपांचे वाटप करण्यात आले. ज्यात आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, सीताफळ, रामफळ तसेच दररोज उपयुक्त ठरणाऱ्या कडीपत्त्याच्या रोपांचा समावेश आहे.

प्रशासकीय सेवेत कार्यरत असणार्या प्रविण इंगवले (भारतीय पोलिस सेवा) व नायब तहसीलदार अमोल कदम या माणच्या सुपुत्रांच्या आई-वडीलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हर्षदा देशमुख-जाधव, दहिवडीचे नगरसेवक अजित पवार, रमेश शिंदे, प्रविण काळे सह्याद्री देवराईचे समन्वयक योगेश गायकवाड, अनुलोमचे माण-खटावचे भाग जनसेवक दादा जगदाळे, बापूराव जगदाळे, कुळकजाईच्या सरपंच मनिषा घाडगे, परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, काळेवाडी व कारखेलच्या सरपंच शोभा राऊत, उपसरपंच रमेश गायकवाड, पुकळेवाडीचे सरपंच ब्रम्हदेव पुकळे, आप्पासाहेब देशमुख, किशोर इंगवले, हेमंत निंबाळकर, प्रशांत विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या की, शासकीय सेवेत असताना प्रभाकर देशमुख यांनी जलयुक्त शिवार ही संकल्पना मांडली. या चळवळीने राज्यातील दुष्काळी भागाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. यापुढे जाऊन प्रभाकर देशमुख यांनी शाश्वत विकासासाठी जलयुक्त प्लस ही चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीचा भाग म्हणून ग्रीन-माण खटाव हा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धानाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याची गरज आहे. माण- खटावने जलसंधारणाच्या कामात एकोप्याचा व विक्रमी संख्येने कामाचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला. हीच एकी आपण वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनात दाखवूया. सर्वजण मिळून शाश्वत, सुखी, समृद्ध माण-खटाव उभारुया असे प्रतिपादन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.

अजित पवार म्हणाले की, जलसंधारणाच्या कामांत गावकऱ्यांनी दाखविलेली एकजूट वृक्षारोपणाच्या कामातही दाखवू. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

पुकळेवाडीत नव वर-वधुंनी केले वृक्षारोपण
पुकळेवाडीतील सचिन पुकळे व प्रियांका झिमल, जिजाबा पुकळे व सायली नारनवर या दोन्ही वर-वधूंनी विवाहबंधनात अडकल्यानंतर हर्षदा देशमुख यांच्यासोबत गावातील शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT