Funeral in Ahmednagar on Corona Patient Woman at Kopargaon 
पश्चिम महाराष्ट्र

कोपरगावच्या कोरोनाबाधित महिलेवर नगरमध्ये अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा आज नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्‍यातील शिंगणापूर येथील संशयित महिलेचासुद्धा ग्रामीण रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला.

दरम्यान, कोरोनाबाधित महिलेवर नगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. लक्ष्मीनगर भागात कोपरगाव पालिकेच्या सहकार्याने निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली असून, परिसरातील 1200 नागरिकांची तपासणी केली आहे. 

लक्ष्मीनगर भागातील 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे गेल्या शुक्रवारी आढळून आले होते. तिच्या संपर्कात असलेले व अन्य अशा 18 जणांचे चाचणी अहवाल "निगेटिव्ह' आले होते. या सर्वांना शहरातील एका हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर भाग पूर्ण "सील' करण्यात आला असून, त्या भागातील अत्यावश्‍यक सेवादेखील बंद आहेत.

दरम्यान, शिंगणापूर येथील एका 65 वर्षीय महिलेला कोरोना-संशयित रुग्ण म्हणून शुक्रवारी रात्री उशिरा नगर येथे तपासणीसाठी नेले होते. तिचा अहवाल "निगेटिव्ह' आला होता. त्यामुळे तिला काल (ता. 13) कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनिया व अन्य आजारांवरील उपचारांसाठी दाखल केले होते; मात्र आज सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने तिचे निधन झाल्याचे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले. 
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, की लक्ष्मीनगर व त्याशेजारील तीन किलोमीटरपर्यंतचा सर्व भाग लॉकडाउन करण्यात आला आहे.

रोज तीस आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT