deth 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज तालुक्‍यात खटावला विहिरीत बुडून मुलीचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

आरग (सांगली) : खटाव ( ता. मिरज ) येथील ऐश्वर्या बिराप्पा गावडे ( वय 6 ) हीचा राहत्या घरासमोरील विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवार ( ता. 4 ) दुपारी दोन पासून ऐश्वर्या बेपत्ता झाली होती. कुटुंबियानी परिसरात दिवसभर शोध घेतला मात्र तिचा कोठेही शोध ठिकाणा सापडला नाही. शेवटी कुटुंबीयांनी मुलीची अपहरण झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केली. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ऐश्वर्याचे वडील बिराप्पा अण्णाप्पा गावडे हे मेढपाळ व्यवसाय करतात. मेंढरे चारण्यासाठी ते दिवसभर बाहेर गेले होते. तिची आई घरातच काम करीत होती. त्यांना एकूण दोन मुले व एक मुलगी असे अपत्य आहे. दोन्ही मुले घराशेजारीच खेळत होती. ऐश्वर्या ही सर्वात लहान होती. मात्र , ऐश्वर्या ही कुठे दिसेनाशी झाल्यानंतर आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु , तिचा कोठेही शोध ठिकाणा सापडला नाही. तसेच कुटुंबीयांनी लगेच मुलीची अपहरण झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केली. 


पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. रात्रभर राहत्या घरी व परिसराचा शोध घेतला. राहत्या घरासमोरील विहिरीत मुलीचा मृतदेह बुडाल्याची शंका पोलिसांनी वाटली. विहिरीत पाणी जास्त असल्याने दोन मोठ्या मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आले. मात्र, गुरुवारी पहाटे विहिरीच्या तळाशी ऐश्वर्याचा मृतदेह आढळून आला.सहा वर्षाच्या चिमुकिलीची मृत्यू झाल्याचे समजताच संपूर्ण गाव शोकाकूल वातावरणात बुडाला. 
यावेळी घटनास्थळी मिरज ग्रामीणचे प्रोबेशन्ल ऑफिसर एस.पी. आदित्य मिरखेलकर, प्रविण वाघमोडे, राजेंद्र बाबर, महादेव जातार, चंदू वाघ तसेच पोलीस पाटील भैराप्पा पाटील घटनास्थळी माहिती घेण्यासाठी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदेकरला मत, विकासाला मत! तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला; घोषणा देत बंडू आंदेकरसह लक्ष्मी, सोनालीने भरला अर्ज

Crime: फक्त २० रुपयांवरून वाद पेटला, पतीला राग अनावर झाला, आधी पत्नीला संपवलं नंतर..; धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं

शुटिंगदरम्यान जितेंद्र जोशीच्या गळ्याला बसलेला फास, अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना म्हणाला... 'स्टूल काढलं अन्...'

Salman Khan Birthday: टायगर, तुमचे प्रेम.... ! सलमानसाठी एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

BMC Electikon: कलानी गटाचा शिंदेसेनेत विलीन होणार? उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढणार

SCROLL FOR NEXT