Nitin Gadkari sakal
पश्चिम महाराष्ट्र

'महापालिकेला काँक्रीट रस्त्यांसाठी 130 कोटी द्या'; केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

महापुराने, अतिवृष्टीने महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब होत असल्याने मोठे नुकसान

बलराज पवार : सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेला काँक्रीट रस्त्यांसाठी १३० कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची महापालिकेचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सभागृहनेते विनायक सिंहासने यांनी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह कराड येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्री श्री. गडकरी यांना निवेदन दिले.

गेल्या दोन वर्षात महापालिका क्षेत्राला महापूर त्यानंतर कोरोना महामारीचा सलग दोन वर्षे फटका आणि पुन्हा महापुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर नागरिकांचे तसेच बाजारपेठेचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने विकास कामांसाठी महापालिकेला निधी कमी पडत आहे. त्यातच महापुराने, अतिवृष्टीने महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे रस्ते काँक्रीटचे करण्याबाबत महापालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या निधीतून महापालिकेला एकशे तीस कोटी रुपये द्यावेत अशी मागणी सभापती श्री. आवटी यांनी केली आहे.

सभापती श्री. निरंजन आवटी म्हणाले, कराड येथे झालेल्या रस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी दिली. यावेळी त्यांना महापूर तसेच कोरोना महामारीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. शहरात कॉक्रेट रस्ते करण्यासाठी शंभर कोटी तसेच सांगलीतील राजर्षी शाहू महाराज (१०० फुटी) रस्ता काँक्रीट करण्यासाठी ३० कोटी अशी १३० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, असे सभापती आवटी यांनी सांगितले.

यावेळी मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, सुरेश आवटी, माजी सभापती संदीप आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, मोहन व्हनखंडे, दीपक माने, अशरफ वांकर, महेश पाटील, धनेश कातगडे, सुनील मोतुगडे, अजिंक्य हंबर, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT