Gokul Milk Collection Decreased By Two Lakhs
Gokul Milk Collection Decreased By Two Lakhs 
पश्चिम महाराष्ट्र

अबब ! गोकुळचे दुध संकलन दोन लाखांनी घटले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महापूर आणि अतिवृष्टीमुळे बदललेल्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनालाही बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दैनंदिन संकलनात तब्बल दोन लाख लिटरची घट झाली आहे. यात म्हैस दूध ४५ हजार लिटरने, तर गाय दूध संकलन १.४५ लाख लिटरने घटले आहे. यंदा जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जिल्ह्यातील सुमारे ३५० हून अधिक गावांना बसला आहे. 

सर्वसाधारणपणे ऑक्‍टोंबरनंतर दूध उत्पादनात वाढ होते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही वाढ कायम असते; पण हवामान बदलामुळे या काळातही दूध उत्पादनात वाढ झालेली नाही. त्यातच ‘गोकुळ’ने गाय दूध संकलनात वाढ झाल्याने गायींसाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या. ‘गोकुळ’ने म्हशीप्रमाणेच गायीसाठी वासरू संगोपन योजना सुरू केली होती, बाहेरून कितीही गायीचे दूध आले तरी ते स्वीकारले जात होते; पण अलीकडे वासरू संगोपन योजना बंद करण्यात आली. बाहेरून येणारे गाय दूध फक्त ३० ते ४० टक्के स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुभत्या गायी घेतलेला उत्पादक या व्यवसायापासूच दुरावला. त्याचा फटका गाय दुधाच्या उत्पादनावर झाला आहे. संकलनात जरी घट झाली असली तरी ‘गोकुळ’च्या दूध विक्रीत कायम आहे. बाजारात ‘गोकुळ’ च्या दुधाला मागणी प्रचंड असल्याने विक्रीवर घटलेल्या संकलनाचा कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी vघेतली जात आहे. 

‘अमूल’ लाही फटका

देशात सर्वाधिक दैनंदिन दूध संकलन असलेल्या गुजरातमधील अमूल दूध संघालाही या बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. ‘अमूल’ चे दैनंदिन दूध संकलन दोन कोटी लिटर आहे, त्यात तब्बल ४० लाख लिटरची घट होऊन हे संकलन १ कोटी ६० लाख लिटरवर आले आहे. हरियाना, उत्तर प्रदेश या दूध उत्पादन होणाऱ्या राज्यातही दुधाचे संकलन घटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT