Gold Ring Prize For Wangi Gram Panchayat Tax Payers 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांसाठी 'येथे' सोन्याची अंगठी बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

वांगी ( सांगली ) - ग्रामपंचायतींच्या थकित घरपट्टी व पाणीपट्टीचा परीणाम विकासकामांवर होतो. शिवाय वसूलीच्या प्रमाणातच निधी देण्याचे शासनाचे धोरण असल्याने व सर्वच ग्रामपंचायतींची थकबाकी प्रचंड असल्याने विकासकामे करण्यात पदाधिकारी हतबल झाले आहेत. मात्र वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच डाॅ. विजय होनमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी हाती घेतल्यापासून प्रत्येक अडचणीवर मात करीत लोकाभिमूख कारभार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार गावातील घरपट्टी व पाणीपट्टीचा नियमित कर भरणाऱ्या खातेदारांसाठी अभिनव बक्षीस योजना अंमलात आणत आहेत.

"कर वसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना" या नावाने ही बक्षीस योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रथम ,द्वितीय, तृतीय अशी एकूण तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, द्वितीय बक्षीस तीन ग्रॅम सोन्याची अंगठी तर तृतीय बक्षीस दोन ग्रॅम सोन्याची अंगठी असे बक्षिस राहील. सन 2019 - 20 या वर्षापासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणारे खातेदार या योजनेत भाग घेऊ शकतील. तर, ग्रामपंचायतीचे सरपंच ,सदस्य व कर्मचारी या योजनेत भाग घेता येणार नाही असेही जाहीर करण्यात आले आहे .

लकी ड्राॅ द्वारे बक्षीस

त्याचबरोबर या योजनेची अंतिम मुदत ही 15 मार्च 2020 पर्यंत राहील .या तारखेनंतर कर भरणाऱ्या खातेदारांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. 15 मार्च 2020अखेर संपूर्ण करणाऱ्या खातेदारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल व या यादीतील खातेदारांच्या नावाच्या चिठ्या करून त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येईल नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेदारांच्या नावाच्या चिठ्यातून लकी ड्रॉ बॉक्समध्ये ठेवण्यात येतील व लहान मुलांकरवी तीन चिठ्ठ्या उचलण्यात येतील हा लकी ड्रॉ विशेष ग्रामसभेचे आयोजन करून इन कॅमेरा काढण्यात येईल असे ग्रामपंचायत वांगी कडून प्रकटन नोटीस द्वारे जाहीर करण्यात आले आहे. या योजनेचे पंचक्रोशीतून कौतूक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT