पश्चिम महाराष्ट्र

खुषखबर...सांगली जिल्ह्यातील केशरी कार्डच्या 10 लाख लोकसंख्येला मिळणार धान्य

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना संकटात दिलासा देणारी बातमी आहे. एपीएल अर्थात केशरी कार्डधारक, जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीमध्ये नाहीत अशांनाही मे आणि जून महिन्यांसाठीचे धान्य वाटप होणार आहे. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळेल. मे महिन्याचे धान्य 25 एप्रिलपासून वाटप होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी आधार लिकिंगची गरज नसेल. ऑफलाईन पध्दतीने जिल्ह्यातील 10 लाख 18 हजार लोकांना हे धान्य मिळेल. हे धान्य त्यांना प्रथमच मिळेल.

केशरी शिधापत्रिकाधारकांना कार्ड केवळ ओळखीच्या पुराव्यासाठीच उपयोगी ठरायचे. त्याचा लाभ काहीच नसायचा. मात्र सध्याच्या आपत्तीत हे कार्ड दाखवले तरी धान्य मिळणार आहे. याबाबत सर्वांचीच ही आग्रही मागणी होती. 15 एप्रिलला सकाळनेही या आशयाचे वृत्त प्रसिध्दीस दिले होते.
त्यामुळे आता राशन कार्ड ऑनलाईन किंवा आधार लिंक नसले तरी चालेल. फक्त कार्डधारकाचा मोबाईल क्रमांक नोंदवून कुटुंबातील व्यक्तीच्या प्रमाणात धान्य दिले जाईल. त्यासाठी एक छोटा फॉर्म भरुन घेतला जाईल. धान्य पोहचल्याचा शिक्का मारला जाईल. मे आणि जून या दोन महिन्यांसाठीच ते मिळेल. जूनचे वाटप 25 मेपासून होईल असा अंदाज आहे. तीन किलो गहू 8 रुपये व दोन किलो तांदूळ 12 रुपये किलो दराने मिळणार आहे. ही राज्य शासनाची योजना आहे. धान्याच्या पारदर्शी वाटपाची जबाबदारी ग्रामीण स्तरावरील पुरवठा दक्षता समिती घ्यायची आहे असे पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सध्या सर्वच संकटात आहेत. अशावेळी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. एप्रिलपासूनच शासनाने धान्य द्यायला हवे होते. लॉकडाऊनचा कालावधी आणि भविष्यातील एकूणच रोजगाराची स्थिती पाहून शासनाने ही योजना पुढील वर्षभरासाठी राबवणे गरजेचे आहे. आम्ही त्यासाठीही पाठपुरावा सुरु ठेवू.
सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र हवामान अंदाज! पुढचे काही दिवस पावसाचे सावट; आंबा, काजू बागायतीवर परिणाम, असा असेल अंदाज

Nagpur Child Abuse Case : नागपूर हादरलं! जन्मदात्यांनीच १२ वर्षीय मुलाल साखळीने बांधलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Resume लगेच अपडेट करा! 2026 मध्ये या विभागात निघणार मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Matar Dhokla Recipe: नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा मटार ढोकळा, घरच्यांकडून मिळेल वाहवा!

अग्रलेख - कृष्णेच्या काठाकाठाने

SCROLL FOR NEXT