ATP20A00744_pr.jpg
ATP20A00744_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीकरांसाठी  गुड न्यूज ः काय ते वाचा 

नागेश गायकवाड

आटपाडी (सांगली) ः टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपारिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे.

भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. यावर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरुन तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत.

सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतुन ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे. सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जून पर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईन मधून दिघंची तलावात भरला आहे.

अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाऊनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

कोट 
टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे- 

प्रकाश गायकवाड 
( शेतकरी शेटफळे.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT