सांगली, ः खरीप हंगामासाठी यंदा चांगला पाऊस पडणार असे शुभसंकेत मिळाल्याने यंदा कृषी विभागासह शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव सुरु केली आहे. जिल्ह्यात खरीपात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबिनचे पिक घेतले जाते. कृषी विभागाने सोयाबिन पेरणी होणाऱ्या गावांत घेतलेल्या बीयाणे प्रात्यक्षिकांमध्ये उगवण क्षमता 73 टक्के असल्याचे निकर्ष पुढे आले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.
याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, खरीप हंगामाच्या पाश्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृषि विभागाकडून सोयाबीन बियाणे उगवण चाचणीची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत सोयाबीनची पेरणी करणाऱ्या गावात 1 हजार 234 सोयाबीन बियाणांची उगवण चाचणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या चाचणीनुसार सरासरी उगवण क्षमता 73 टक्के आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृषि विभागाने ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना मागणीनुसार त्यांच्या बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याची मोहीम शेतकरी गटामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात खते व बियाणे बांधावर पुरवठ्यासाठी एकूण 708 गट कार्यरत आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 8 हजार 359 शेतकऱ्यांना 1666 क्विंटल बियाणे व 3789 टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
तालुकानिहाय घेण्यात आलेल्या सोयाबीन बियाणांची उगवण चाचणी प्रात्यक्षिकांची व कंसात उगवण टक्केवारीची आकडेवारी
पुढीलप्रमाणे. कडेगाव 150 (72), तासगाव 128 (80), विटा 47 (70), पलूस 310 (82), कवठेमहांकाळ 3 (67), शिराळा 55 (70), मिरज 181 (68), वाळवा 360 (76.66).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.